मुलींच्या आईवडिलांचा अवघ्या १२ तासांत शोध

By Admin | Updated: October 18, 2015 00:37 IST2015-10-18T00:37:48+5:302015-10-18T00:37:48+5:30

सावनेर तालुक्यातील पिपळा डाकबंगला येथील वाघाडे परिवारातील तीन चिमुकल्या परिवारापासून भरकटून तीन दिवसांपासून वरुडच्या बसस्थानकावर होत्या.

Search of girls' parents only in 12 hours | मुलींच्या आईवडिलांचा अवघ्या १२ तासांत शोध

मुलींच्या आईवडिलांचा अवघ्या १२ तासांत शोध

पोलीस कारवाई : तीन दिवसांपासून बसस्थानकावर
वरुड : सावनेर तालुक्यातील पिपळा डाकबंगला येथील वाघाडे परिवारातील तीन चिमुकल्या परिवारापासून भरकटून तीन दिवसांपासून वरुडच्या बसस्थानकावर होत्या. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता या मुली बेवारस झोपलेल्या एसटीचालकांनी माहिती दिली. उपनिरीक्षक सुबोध वंजारी आणि कर्मचाऱ्यांनी बसस्थानकात जाऊन त्या मुलींची विचारपूस केली. अखेर पोलिसांनी मुलींंच्या आईवडीलांचा १२ तासांत शोध घेतला.
पोलिसांनी रात्रभर सावनेर पोलिसांसोबत सातत्याने संपर्क ठेवून सकाळी आईवडीलांचा शोध घेतला. एकतर त्या चिमुकल्यांना आईवडीलानेच हाकलून लावले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुपारी ३.३० वाजतादरम्यान काजल राधिका आणि गंगाची आई ठाण्यात दाखल झाली. ठाणेदार अर्जुन ठोसरे, उपनिरीक्षक सुबोध वंजारी यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून प्रमिला ताराचंद वाघाडे आणि रेखा रामचरण यादव या दोघींच्या ताब्यात दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Search of girls' parents only in 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.