वृद्धाला गंडविणाऱ्या भामट्याचा शोध सुरू
By Admin | Updated: June 4, 2016 00:06 IST2016-06-04T00:06:30+5:302016-06-04T00:06:30+5:30
एटीएममध्ये एका वृद्धाला पैसे ट्रान्सफर करून देणाच्या नावावर गंडविणाऱ्या भामट्यासह शहरातील एका साडी विक्रीच्या दुकानातून मुद्देमालासह साड्या

वृद्धाला गंडविणाऱ्या भामट्याचा शोध सुरू
सीसीटीव्हीचा आधार : परतवाडा पोलीस सक्रिय
परतवाडा : एटीएममध्ये एका वृद्धाला पैसे ट्रान्सफर करून देणाच्या नावावर गंडविणाऱ्या भामट्यासह शहरातील एका साडी विक्रीच्या दुकानातून मुद्देमालासह साड्या चोरणाऱ्या चोरट्याचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या दोघांचा शोध परतवाडा पोलिस घेत आहेत.
परतवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील महावीर चौक स्थित एक्सीस बँकेच्या एटीएममध्ये शालिकराम अरबट (रा. कांडली) हे ३ फेब्रुवारी २०१६ रोजी मुलाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गेले होते. तेथे एक अज्ञात व्यक्त आला त्याने पैसे ट्रान्सफर करून देण्याचे अरबट यांना सांगितले. एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकल्यावर ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची बतावणी केली. आपले एटीएम दुसऱ्या बँकेचे असल्याचे सांगून अरबट यांना पाठवून दिले व सदर भामट्याने दहा हजार रुपये काढून पोबारा केला. सदरचे चित्र एक्सीस बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शालिकराम अरबट यांनी परतवाडा ठाण्यात तक्रार दिली. तपासात त्या अज्ञात चोरट्याचे चित्र घेऊन पोलीस एम. एस. कवाडे व कर्मचारी करीत आहे. दुसऱ्या घटनेत सदर बाजार परिसरात शिवकुमार कैलासचंद्र बन्सल यांचे साडी विक्रीचे दुकान असून तेथे अज्ञात चोरट्याने दीडशे साड्या, चांदीचे सिक्के, मूर्ती असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.