शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी न भरणाऱ्यांची प्रतिष्ठाने सील

By admin | Updated: June 19, 2014 23:37 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या व्यावसायिकांची मुस्कटदाबी करण्यासाठी महापालिकेने रणनीती आखली आहे. २३ जूनपासून प्रतिष्ठाने सील करण्यासह बँक खाते गोठविण्याची कारवाई करण्याबाबतच्या

आयुक्तांचा निर्णय : नोटिशी बजावल्या, बँक खाती गोठविणारअमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या व्यावसायिकांची मुस्कटदाबी करण्यासाठी महापालिकेने रणनीती आखली आहे. २३ जूनपासून प्रतिष्ठाने सील करण्यासह बँक खाते गोठविण्याची कारवाई करण्याबाबतच्या नोटीशी संबंधित व्यापाऱ्यांना बजावल्या आहेत.एलबीटी किंवा जकातही नको या मागणीने राज्यातील व्यावसायिकांनी शासनकर्त्यांना कात्रीत पकडले आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी एलबीटी विक्रीकरातून वसूल करण्याचा निर्णय घेतला. मात्र एलबीटी न भरण्याचा चेंबर्सने घेतलेल्या निर्णयाचा आधार घेत येथील व्यावसायिकांनी कराचा भरणा बंद केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात बरीच घट झाली आहे. ही बाब लक्षात येताच महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी एप्रिलपासून ज्या व्यावसायिकांनी एलबीटीचा भरणा केला नाही, अशा प्रतिष्ठानांना नोटीस बजावून कराचा भरणा करण्याचे कळविले आहे. आतापर्यंत २५० व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या असून २३ जूनपासून हे प्रतिष्ठाने सील करून बँक खाते गोठविण्याची धडक कारवाई सुरू केली जाईल, असे जकात अधीक्षक सुनील पकडे यांनी सांगितले. मे महिन्यात एलबीटीच्या उत्पन्नाची आकडेवारी अतिशय कमी आहे. परिणामी प्रशासनाचे नियोजन बिघडले. महापालिकेला दरमहा १० कोटी रूपयांचा खर्च लागत असल्याने हा खर्च एलबीटीच्या उत्पन्नाशिवाय शक्य नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. शासनाने एलबीटीसंदर्भात कोणतेही धोरण निश्चित केले नाही. तत्पूर्वी व्यावसायिकांनी एलबीटी भरण्यास नकारात्मक भूमिका घेतल्याने प्रशासनाने ही भूमिका बदलविण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. एलबीटी नोंद असलेल्या प्रतिष्ठानांचे कर न भरल्याबाबतचे सर्चिंग सुरु करण्यात आले आहे. यादरम्यान ज्या व्यावसायिकांनी कराचा भरणा केला नाही, अशा प्रतिष्ठानांना सील लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरात व्यवसाय करीत असल्यास एलबीटी भरावेच लागेल. त्यामुळे व्यावसायिकांनी कारवाई टाळण्यासाठी एलबीटीचा भरणा करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.