बीअर बारऐवजी कंपाऊड गेटला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:01 IST2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:01:10+5:30
संचारबंदीच्या काळात अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी दारू दुकाने व बिअर बारला सील लावण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. परंतु, येथील एका बिअर बारच्या गोडावूनऐवजी कंपाऊंडच्या गेटला सील लावल्याचा अफलातून प्रकार उघड झाला. गेटच्या वरून चढून गोडाऊनमधील दारूचे बॉक्स काढले जात असल्यामुळे एक्साईज विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

बीअर बारऐवजी कंपाऊड गेटला सील
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : संचारबंदीच्या काळात अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी दारू दुकाने व बिअर बारला सील लावण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. परंतु, येथील एका बिअर बारच्या गोडावूनऐवजी कंपाऊंडच्या गेटला सील लावल्याचा अफलातून प्रकार उघड झाला. गेटच्या वरून चढून गोडाऊनमधील दारूचे बॉक्स काढले जात असल्यामुळे एक्साईज विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
अवैध दारू विक्रीला आळा घालण्याचे काम एक्साईजचे आहे. तालुक्यातील अवैध दारूच्या कारवाया पोलिसांकडून होत असल्याने तालुक्यात एक्साईज विभाग आहे की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. चांदूर रेल्वे पोलिसांनी कारवाया केल्यानंतर एक्साईजच्या स्थानिक यंत्रणेला जाग आली. त्यांनी तालुक्यातील सर्व दारू दुकान, बारला सील लावण्याचे काम हाती घेतले. शहरातील कुºहा रोडवरील न्यू आदित्य वाईन बारच्या बाहेरील कंपाऊंडच्या गेटला सील लावले. असे असताना या बारमधून बंद दरम्यानही दारूसाठा बाहेर जात असल्याचे काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. चांदूर रेल्वेचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी या बारची पाहणी केली असता, हा प्रकार निदर्शनास आला.