विद्यापीठाच्या निकालावर विद्वत परिषदेची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 05:00 AM2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:01:59+5:30

राज्य शासनाने अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, हे निकाल कसे जाहीर करावे, गुणदान करण्याची प्रक्रिया, महाविद्यालयांची जबाबदारी आदी विषय स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, परीक्षा विभागाने विद्वत परिषदेच्या मान्यतेसाठी हा मुद्दा ठेवण्यापूर्वी निकाल जाहीर करण्याबाबतचे निकष, सूत्र निश्चित केले. यात विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.

Seal of the Academic Council on the results of the University | विद्यापीठाच्या निकालावर विद्वत परिषदेची मोहोर

विद्यापीठाच्या निकालावर विद्वत परिषदेची मोहोर

Next
ठळक मुद्देपरीक्षा विभागाचे सूत्र मान्य : अंतिम सत्र वगळून दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार गुणदान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंतिम सत्र वगळता इतर सत्रांचे निकाल जाहीर करण्याविषयी गुरुवारी विद्वत परिषदेची मोहोर उमटली. त्यामुळे आता दीड लाख विद्यार्थ्यांना गुणदान होणार असून, परीक्षाविना पुढील वर्गात त्यांना प्रवेश घेता येतील. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने निकालाबाबत ठरविलेले सूत्र विद्वत परिषदेने मंजूर केले आहे. यादरम्यान निकालात काही बदल करण्याचे अधिकार कुलगुरुंना बहाल करण्यात आले आहे.
राज्य शासनाने अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, हे निकाल कसे जाहीर करावे, गुणदान करण्याची प्रक्रिया, महाविद्यालयांची जबाबदारी आदी विषय स्पष्ट झाले नव्हते.
दरम्यान, परीक्षा विभागाने विद्वत परिषदेच्या मान्यतेसाठी हा मुद्दा ठेवण्यापूर्वी निकाल जाहीर करण्याबाबतचे निकष, सूत्र निश्चित केले. यात विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. त्याअनुषंगाने गुरुवारी विद्वत परिषदेच्या आॅनलाईन बैठकीत परीक्षा विभागाने तयार केलेल्या निकालाबाबतची नियमावली, सूत्रांवर सदस्यांनी चर्चा केली. त्यानंतर निकाल तयार करण्याच्या कार्यप्रणालीवर विद्वत परिषदेने मोहोर उमटवली.

अशी असेल नवी कार्यप्रणाली
परीक्षांच्या अभ्यासक्रमिकेत ज्या परीक्षांना सर्व विषयांना अंतर्गत गुण असतील आणि मागील सत्राची या अगोदर परीक्षा झालेली असेल, अशा परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक, प्रक ल्प परीक्षांना गुणदान करण्यात येतील. परीक्षेत काही विषयांना अंतर्गत सत्र गुण असतील, तर काही विषयांना अंतर्गत सत्र गुण नसतील. मागील लगतच्या सत्राची या अगोदर परीक्षा झाली आहे, अशा परीक्षांना लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प परीक्षांचे गुण दिले जाणार आहे. अंतर्गत सत्र गुणांच्या टक्केवारीप्रमाणे लेखी गुण मिळतील. गुणपत्रिकेवर कोविड असा कोणताही उल्लेख असणार नाही, असा निर्णय झाला.

विद्वत परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत दीड लाख विद्यार्थ्यांना गुणदान मिळणार आहे. अंतिम सत्र परीक्षाविना गुणपत्रिका दिली जाणार असून, पुढील वर्षात प्रवेश दिला जाणार आहे.
- हेमंत देशमुख,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन.

Web Title: Seal of the Academic Council on the results of the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.