शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती जिल्ह्यावर ‘स्क्रब टायफस’चे मळभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:03 IST

सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस' या कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा सजग उपाययोजनांचे निर्देश

प्रदीप भाकरे ।आॅनलाईन लोकमतअमरावती : सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस' या कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. राज्यात इतरत्र या आजाराची लागण होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य यंत्रणेला देण्यात आले.रिकेटशिअल आजारात मोडणाऱ्या स्क्रब टायफसवर नियंत्रण राखण्यासाठी या आजाराचे नियमित सर्वेक्षण, निदान व उपचाराबाबत पायाभूत सुविधा बळकट करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य सेवा सहसंचालकांनी उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याना दिले आहेत. कीटकापासून माणसात संक्रमित होणाऱ्या ‘स्क्रब टायफस’ या आजाराचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल २ आॅक्टोबरला प्राप्त झाला. त्याअनुषंगाने रिकेटशियल आजाराबाबत प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.स्क्रब टायफसची लक्षणे‘स्क्रब टायफस’ या आजारात झटके येणे, शरीरातील पाणी कमी होणे, ताप येणे, अशी लक्षणे आढळतात. हा ताप १०४ डिग्रीपर्यंत राहतो. साधारण २४ तासाच्या आत थकवा येणे, अंगदुखी, स्रायू, सांधे दुखू लागतात. या आजाराचे वेळीच निदान झाले नाही तर शरीरात दबा धरुन बसणारे हे परजिवी मेंदूची, मुत्रपिंडाची क्रिया बंद पाडू शकतात. साधारणपणे ताप आणि काविळीचे लक्षणे आढळून आल्यानंतरही हा आजार अनेकदा डोके वर काढतो.काय आहे स्क्रब टायफस ?ओरिएन्शिया सुसुगामशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर आजार म्हणजे स्क्रब टायफस. कीटकापासून माणसात संक्रमित होणाऱ्या  या आजारात ज्या ठिकाणी ‘चिगर’ चावतो तेथे एक व्रण येतो. जेथे झाडीझुडूप किंवा गवत असते, त्यावर हे ‘चिगर’ कीटक असतात. साधारणपणे पानावर वाढणाऱ्या  कीटकांपासून स्क्रब टायफस होतो. या कीटकाने चावा घेतल्यानंतर त्याच्या सोंडेतील विषाणू रक्तामार्फत शरीरात प्रवेश करतात. अतिशय सूक्ष्म असलेला हा किडा उकिरडे, शेणखत आणि काडीकचऱ्यावर जगतो. हा आजार ‘माईटस्द्वारा पसरणारा कीटकजन्य आजार आहे. बºयाचशा भागात हा सिझनल असला तरी जिथे लोकांचा झाडाझुडुपांशी नियमित संपर्क येतो, तेथे हा वर्षभर आढळतो.

टॅग्स :Healthआरोग्य