शास्त्रज्ञ आनंद घैसास आज अमरावतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:37 IST2017-11-21T23:37:12+5:302017-11-21T23:37:47+5:30
टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्चचे शास्त्रज्ञ आनंद घैसास हे बुधवारी अमरावतीत येत आहेत.

शास्त्रज्ञ आनंद घैसास आज अमरावतीत
आॅनलाईन लोकमत
अमरावती : टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्चचे शास्त्रज्ञ आनंद घैसास हे बुधवारी अमरावतीत येत आहेत. ‘थिंक शाश्वत’च्या ‘चला सहज सोप्या पद्धतीने विज्ञान शिकू या’ या बुधवारी १२ वाजता उद्घाटित होणाºया विज्ञान मार्गदर्शन व प्रदर्शनाचे मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित असतील.
विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असलेली विज्ञानाची भूक जागृत व्हावी, यासाठी शास्त्रज्ञ घैसास हे चार दिवस मुलांना विविध वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी करून घेणार आहेत. कॅम्प मार्गावरील शाश्वत कन्सेप्ट स्कूलच्या प्रांगणात होणारे हे प्रदर्शन सर्वच विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क खुले आहे. परंपरागत पद्धतीला फाटा देऊन विज्ञान आकलनाची प्रयोगशील आयोजनाची विदर्भातील ही पहिलीच वेळ आहे. विज्ञानाची जिज्ञासा असलेल्या विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असे हे आयोजन असल्याचे ‘थिंक शाश्वत’ने कळविले आहे.
जिल्हाधिकारी अभिजित बांगर प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव धनंजय धवड, प्रयोगशील शिक्षणाचे अभ्यासक अतुल गायगोले, प्रसिद्ध मूर्तिकार अतुल जिराफे हे याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.