एका क्लिकवर मिळणार शाळांची माहिती

By Admin | Updated: June 19, 2014 23:36 IST2014-06-19T23:36:31+5:302014-06-19T23:36:31+5:30

राज्याच्या शिक्षण विभागाने सर्वच शाळा आॅनलाईन व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या माध्यमातून सर्व शाळा एकाच छताखाली आणणे सोईचे होणार आहे. यासाठी सर्व शाळांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे.

School information will be available in one click | एका क्लिकवर मिळणार शाळांची माहिती

एका क्लिकवर मिळणार शाळांची माहिती

अमरावती : राज्याच्या शिक्षण विभागाने सर्वच शाळा आॅनलाईन व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या माध्यमातून सर्व शाळा एकाच छताखाली आणणे सोईचे होणार आहे. यासाठी सर्व शाळांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे. विशिष्ट नमुन्यात ही माहिती संकलित केली जात असल्याने लवकरच सर्व शाळांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार २००९ (आरटीई) राज्यात लागू होऊन त्याची अंमलबजवणी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. प्राथमिक शाळांना उर्जितावस्थेत आणून नवीन झळाळी देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आरटीईमध्ये नमूद असल्याप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना सर्व सोई-सुविधा पुरवली जात आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पाने स्वागत, पहिल्याच दिवशी मोफत गणवेश व पुस्तकांचा संच दिला जाणार आहे. पहिलीपासून इंग्रजी शिक्षण असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार येत आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागून दर्जेदार शिक्षण त्यांना लाभ मिळेल यासाठी शिक्षण विभाग सातत्याने प्रयोग करीत आहे.
या अनुषंगाने राज्यामधील सर्व शाळा आॅनलाईन व्हाव्यात यासाठी मागील वर्षापासून शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व शाळांना संगणक देणे, संगणक कक्ष, विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण आदी उपक्रम सुरू आहेत. आॅनलाईनसाठी आवश्यक दूरध्वनीची सुविधा या माध्यमातून सर्व शाळा एकाच छताखाली येऊन शिक्षण विभागालादेखील सर्व माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी ६६६.े२ूीस्र४ल्ली.ूङ्मे या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

Web Title: School information will be available in one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.