शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संचालकस्तरावर शाळा फायलींच्या तपासणीचा फार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 17:38 IST

कायम अनुदानित शाळांमधील 'कायम' हा शब्द निघाल्यानंतर बिनपगारी शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्षांपासून वेतन मिळण्याचा मार्ग सुकर झाला.

अमरावती - कायम अनुदानित शाळांमधील 'कायम' हा शब्द निघाल्यानंतर बिनपगारी शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्षांपासून वेतन मिळण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या फाईलींची मायक्रो तपासणी केल्यानंतरही पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालय स्तरावर शाळा फायलींच्या तपासणीचा फार्स सुरू आहे. परिणामी पात्र शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार नसून यंदाही या शिक्षकांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र आहे.

शासन निर्णयानुसार २० टक्के अनुदानित आणि १ व २ जुलै रोजीच्या घोषित झालेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यात आला. मात्र, वेतनाच्या फायली शिक्षण संचालक कार्यालयात प्रलंबित असल्याने बिनपगारी शिक्षकांना शासन निर्णयानंतरही दिवाळी वेतन मिळणार नाही. जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी फायली तपासूनच त्या शिक्षण संचालकांकडे पाठविला असताना पुन्हा फेरतपासणीच्या नावे शिक्षकांप्रती अडवणुकीचे धोरण सुरू असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शिक्षण महासंघाचे शेखर भोयर यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना शिक्षकांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी पत्रव्यवहार चालविला आहे. शासनाने शाळांसाठी अनुदान देण्यासंदर्भात टक्केवारी जाहीर केली. परंतु, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता नियमित वेतन मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तथापि, शिक्षकांच्या वेतनाच्या फाईलींचा प्रवास शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांकडून पुणे येथे शिक्षण संचालकांकडे पाठविला गेला. दिवाळीपूर्वी या शिक्षकांना वेतन मिळणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण संचालक कार्यालयात फाईलींच्या फेरतपासणीच्या नावाने शिक्षकांची अडवणूक केली जात आहे. फाईलींची तपासणी सूची तयार करण्यात येत असून, त्रुटी काढण्याचा प्रकार सुरू झाला आहे. अगोदर अनेक वर्षे ‘कायम’ विनाअनुदानित शाळांवर सेवा देत असताना शासन निर्णयानंतरही या शिक्षकांच्या पदरी निराशाच आली आहे.

आठ हजार शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षाखासगी शाळा तसेच वर्ग शिक्षक असे मिळून राज्यात सुमारे आठ हजार शिक्षकांना नव्या शासन निर्णयानुसार वेतन मिळणार आहे. अगोदर अनेक वर्षे बिनपगारी पवित्र शिक्षण  क्षेत्रात सेवा दिल्यानंतरही आतातरी शासन निर्णयानंतर नियमित वेतन मिळेल, ही अपेक्षा शिक्षकांना होती. मात्र, यंदा या शिक्षकांना वेतनाअभावी दिवाळी आनंदात विरजण येणार आहे, हे विशेष.

शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी संबंधित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या वेतनाबाबतच्या फाईलींचे बारकाईने तपासणी केली. असे असताना आता पुणे येथे शिक्षण संचालक कार्यालयस्तरावर फेरतपासणीचा फार्स कशासाठी हा देखील संशोधनाचा विषय आहे.- शेखर भोयर, अध्यक्ष, शिक्षक महासंघ

राज्यातील शाळांच्या फाईली प्राप्त झाल्या आहे. शिक्षकांचे वेतनबाबतची तपासणी सुरू आहे. त्वरेने कार्यवाही पूर्ण करून पात्र शिक्षकांना वेतन दिले जाईल.- गंगाधर मम्हाने, संचालक, शिक्षण विभाग, पुणे

टॅग्स :Teacherशिक्षकAmravatiअमरावती