विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निर्णय न झाल्याने शाळा संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:50+5:302021-03-19T04:12:50+5:30

अमरावती : दरवर्षी मार्च महिन्यांत पहिली ते नववीपर्यंत इयत्तांचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन त्यांचे मूल्यमापन केले जाते. मात्र, यंदाचे ...

The school is in a dilemma as the decision to evaluate the students has not been taken | विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निर्णय न झाल्याने शाळा संभ्रमात

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निर्णय न झाल्याने शाळा संभ्रमात

अमरावती : दरवर्षी मार्च महिन्यांत पहिली ते नववीपर्यंत इयत्तांचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन त्यांचे मूल्यमापन केले जाते. मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप मूल्यमापन योजनेविषयी निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे शाळा शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्यायच्या याबाबतचे नियोजन अद्याप केलेले नाही. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे वर्षे प्रत्यक्ष भरलेच नाहीत. तसेच २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवीते आठवीचे वर्ग सुरू करण्यात परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यामध्येही विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ ५० टक्केच होती. शाळेत विद्यार्थी संख्या वाढत असतांनाच कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. त्यामुळे अवघ्या दिड महिन्यातच शाळा बंद कराव्या लागल्या. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायला वेळ मिळाला नाही. परीक्षांच्या नियोजनास मूल्यमापन पद्धतीवरही शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून करण्यात आली आहे.

बॉक्स

२६जून २०२१ पासून म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून पहिली ते चौथीचे विद्यार्थी अद्यापपर्यंत शाळेत आलेले नाही. पाचवी ते नववीचे विद्यार्थी केवळ दीड महिना शाळेत उपस्थित राहीले. त्यांची उपस्थिती फक्त ५० टक्के होती. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचं काम करता आले नाही. मात्र ऑनलाईन पद्धतीने काही प्रमाणात विद्यार्थ्यांना अध्यापन केलेले आहे. काही शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन स्वाध्याय दिले. त्यांची तपासणी देखील केली आहे. त्या आधारावर अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित करण्याचे प्रशासनाने आदेशित करावे.अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

Web Title: The school is in a dilemma as the decision to evaluate the students has not been taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.