शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यात शाळा बंद; ऑफलाईन शिक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम व दुर्गम भागांतील बहुतांश गावात शाळा बंद आहेत. शिक्षण मात्र सुरू आहे. दहावी ते उच्चशिक्षित युवक गावात मिळेल तेथे प्रत्येकी चार ते पाच चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात. शहरी भागातील इंटरनेट सुविधेची मेळघाटच्या आदिवासी भागात बोंब आहे. त्यामुळे जेथे ऑनलाईन शिक्षण शक्य नाही, तेथे शिक्षकमित्र सरसावले आहेत.

ठळक मुद्देयुवा पिढीकडून अध्यापन; झाडाखाली, घरात, समाजमंदिरात चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : ऑनलाईन धडे गिरविता येऊ न शकणाऱ्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना ६०६ शिक्षकमित्र अध्यापन करीत आहेत. अतिदुर्गम गावातीलच उच्चशिक्षित युवक-युवती हे कार्य एक छदामही न घेता करीत आहेत.मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम व दुर्गम भागांतील बहुतांश गावात शाळा बंद आहेत. शिक्षण मात्र सुरू आहे. दहावी ते उच्चशिक्षित युवक गावात मिळेल तेथे प्रत्येकी चार ते पाच चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात. शहरी भागातील इंटरनेट सुविधेची मेळघाटच्या आदिवासी भागात बोंब आहे. त्यामुळे जेथे ऑनलाईन शिक्षण शक्य नाही, तेथे शिक्षकमित्र सरसावले आहेत. शिक्षक मित्र म्हणून एक छदामही न घेता कल्पना कासदेकर, जुगराम धुर्वे, लक्ष्मी कासदेकर, श्यामलाल कासदेकर, शिवा धिकार, श्यामकुमार बेठेकर, रोशनी येवले आदी सहाशेहून अधिक शिक्षकमित्र पहिली ते दहावीपर्यंत शिकवित आहेत.तालुक्यातील १४२ शाळांपैकी मोबाईल रेंजमधील ३८ गावांत पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनविण्यात आले. यामध्ये ४०७ पालक सहभागी झाले. चौºयामल येथे व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅपचा वापर करून शिक्षणक्रम सुरू झाला आहे.‘मेळघाट पॅटर्न’मेळघाटातील शिक्षकमित्र युवक-युवती एखाद्या झाडाखाली, स्वत:च्या घरात वा समाजमंदिरात वर्ग भरवितात. कोरोना कालावधीत चिमुकली शिक्षणापासून वंचित नसल्याने पालक समाधानी आहेत. तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल येगडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणााधिकारी सिद्धेश्वर काळूसे, संदीप बोडके यांचे मार्गदर्शन उपक्रमाला लाभत आहे.मेळघाटच्या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गावातीलच शिक्षित युवक-युवतींमधून शिक्षकमित्र तयार करण्यात आले. स्वत:च्या घरात, झाडाखाली, समाजमंदिरात प्रत्येक चार ते पाच विद्यार्थ्यांना ते दहावीपर्यंत धडे देत आहेत.- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी

टॅग्स :onlineऑनलाइनSchoolशाळा