माणसांच्या गर्दीत भरते पक्ष्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:01+5:302021-02-05T05:32:01+5:30

कावली वसाड : जुना धामणगाव पेट्रोल पंपाजवळ माणसांच्या वस्तीत भल्या पहाटे भरणाऱ्या पक्ष्यांच्या शाळेने पहाटे फिरणाऱ्या नागरिकांच्या नजरेत भुरळ ...

The school of birds fills the crowd of people | माणसांच्या गर्दीत भरते पक्ष्यांची शाळा

माणसांच्या गर्दीत भरते पक्ष्यांची शाळा

कावली वसाड : जुना धामणगाव पेट्रोल पंपाजवळ माणसांच्या वस्तीत भल्या पहाटे भरणाऱ्या पक्ष्यांच्या शाळेने पहाटे फिरणाऱ्या नागरिकांच्या नजरेत भुरळ पाडली आहे.काही दिवसांपासून उन्हाळ्याची चाहूल लागते की काय, असे वाटत असताना चार पाच दिवसांपासून बोचऱ्या थंडीचे आगमन झाले. त्यामुळे पहाटे फिरणारी माणसे कमी झाली. मात्र, पक्ष्यांची ही शाळा त्यांची संख्या वाढली आहे. जुना धामणगाव पेट्रोल पंपासमोरून मंगरूळ दस्तगीरकडे रस्ता जातो. त्या रस्त्याच्या कडेने असलेल्या वीजतारांवर सकाळी सुमारे चार ते पाच हजार पक्ष्यांचा थवा सकाळी किमान एक ते दीड तास असतो. सकाळी प्रखर ऊन पडेपर्यंत ते एकाच ठिकाणी घिरट्या घालतात. हा सुखद अनुभव असल्याचे येेथे येणाऱ्या नागरिकांनी सांगितले. काही अंतरावर वरूड बागाजी येथील बगाजी सागर या धरणावर विचरण करणारे हे पक्षाी असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: The school of birds fills the crowd of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.