शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमाती 'आयोग' पोहोचणार शेवटच्या माणसांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:30 IST

Amravati : २० जिल्ह्यांत ३२ जणांची चमू सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने ३ जून रोजी मंजुरी दिल्यानंतर हा 'आयोग' शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावा, यासाठी राज्यभर प्रचार, प्रचार होणार आहे. या अनुषंगाने आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी पुढाकार घेतला असून, तसे पत्र भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.

'लोकमत'ने गेल्या पाच वर्षापासून हा आयोग स्थापन करण्यासंदर्भात सातत्याने वृत्तमालिका चालविली, हे विशेष. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात, तत्कालीन आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी ही मागणी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर, अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेत ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या ५१व्या बैठकीत तसा ठरावही मंजूर झाला होता. 'ट्रायबल फोरम' ने पाच वर्षापासून मागणी रेटून धरली होती.

या २० जिल्ह्यांमध्ये होतील पत्रपरिषदामुंबई, पालघर, नंदूरबार, नाशिक, धुळे, जळगाव, ठाणे, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नांदेड, हिंगोली, अकोला, अहिल्यानगर, रायगड, जालना या २० जिल्ह्यांमध्ये पत्रपरिषदांमधून भूमिका मांडली जाणार आहे.

'आयोगा'चे श्रेय मुख्यमंत्र्यांनाच

  • आदिवासी विकासमंत्री प्राचार्य अशोक उईके यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अनुसूचित जमाती आयोग हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी २० जिल्ह्यांत ३२ जणांवर जबाबदारी सोपविली आहे.
  • मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी हे जिल्हानिहाय पत्रपरिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजासाठी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाची माहिती देतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजाला दिलेला शब्द पाळला, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. आयोगामुळे आदिवासींच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास योजना आणि कार्यक्रम अंमलबजावणी वेगाने होईल. बिगर आदिवासींनी बळकावलेल्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागांची विशेष पदभरती, अखर्चिक निधी, रखडलेले वनहक्क अशा विविध समस्या सुटतील."- डॉ. संदीप धुर्वे, माजी आमदार केळापूर-आर्णी.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावती