रासायनिक खताचा तुटवडा

By Admin | Updated: October 21, 2014 22:44 IST2014-10-21T22:44:38+5:302014-10-21T22:44:38+5:30

तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषि सेवा केंद्रात युरीया नसल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. पिकांना अत्यावश्यक असलेला

Scarcity of chemical fertilizers | रासायनिक खताचा तुटवडा

रासायनिक खताचा तुटवडा

अधिकारी सुस्त : वरूड तालुक्यातील शेतकरी त्रस्त
वरूड : तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषि सेवा केंद्रात युरीया नसल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. पिकांना अत्यावश्यक असलेला युरीया मिळाला नाही तर पुन्हा शेतकऱ्यांवर सुलतानी संकट ओढवले आहे. यासाठी कृषि विभागाने त्वरीत युरीया खताचा पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.वरुड तालुक्यात युरीया खताचा तुटवडा शेतकऱ्यांना भोवणार असल्याने पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतांना युरीया खत मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी मरनासन्न अवस्थेत आले होते. या आठवडयात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यामध्ये उत्साह संचारला असतांना पिकांना युरीया खत देवून वाढीसाठी प्रयत्न केल्या जाते. पंरत ूबाजारामध्ये युरीया खताचा टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. खते विक्रेत्याकड ेखत नसून इतर जिल्हयातून खत आणले तर पोलीस पकडतात, कृषि विभाग कारवाई करतात. यामुळ ेबाहेरुन ेशतकरी खत आणण्यास धजावत नाही. दुकानदारांना बाहेरुन खत आणता येत नाही. यामुळ ेदुकानदार आणि शेतकऱ्यांनी करावे काय ? असा सवाल केल्या जात आहे. इकडे आड तिकड ेविहीर अशी शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी अस ेम्हणणारे नेते, सरकार सुध्दा शेतकऱ्याला विसरलेले दिसत असल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शेतकऱ्यांना घातक ठरु लागल्यानेच युरीयाचा तुटवडा भासत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Scarcity of chemical fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.