बडनेºयातील एसबीआय खातेदारांच्या एटीएममधून पैसे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:56 IST2017-10-22T00:56:09+5:302017-10-22T00:56:21+5:30

बडनेºयातील एसबीआय खातेदारांच्या एटीएममधून पैसे लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : येथील नव्यावस्तीतील एसबीआय बँकेच्या दोन खातेदारांच्या एटीएममधून परस्पर पैसे लंपास केल्याची तक्रार बडनेरा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तिसºया एका खातेदाराचेदेखील पैसे काढण्यात आले. मात्र वृत्त लिहिस्तोवर सदर इसमाने तक्रार दिलेली नव्हती. या प्रकारामुळे एटीएमधारक धास्तावले आहेत.
नव्यावस्तीतील अरूण बळीराम बलखंडे यांचे बडनेºयातील एसबीआय बँकेत खाते आहे. त्यांच्या त्यांच्या खात्यामधून १ लाख ६० हजार रूपये काढण्यात आले. १४ आॅक्टोबर रोजी एकाच दिवशी सहावेळा पैसे काढण्यात आल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला आहे. त्यानंतर त्यांना सदर प्रकार लक्षात आला. फिर्यादी हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.
नीलिमा सुनील गायकवाड (४४, संजीवनी कॉलनी, बडनेरा) यांचेदेखील याच एसबीआय बँकेत खाते आहे. त्यांच्या एटीएम खात्यातून ३३ हजार रूपये काढण्यात आले. त्यांनादेखील मोबाईलवर आलेल्या संदेशावरून आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे एसएमएसद्वारे समजले. या दोघांनीही बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. सदरप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरूद्ध भादंवि ४२० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक डी.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक एस.एस. आसोले करीत आहे. तिसºया एका खातेदाराच्या खात्यातून ६९ हजार रूपये काढले.
बँक स्टेटमेंट, मोबाईल संदेशावरून तपास सुरू
बडनेºयातील एसबीआय बँकेच्या एटीएममधून परस्पर पैसे काढण्यात आले. त्यांच्या बँक स्टेटमेंट व मोबाईलवर आलेल्या संदेशावरून पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे. एटीएम खात्यातून पैसे लंपास होत असल्याचे प्रकार अधिकच वाढले आहेत. त्यामुळे खातेदार धास्तावले आहेत.