सुंदर गाव योजनेत सावंगी संगम प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:13 IST2021-02-24T04:13:39+5:302021-02-24T04:13:39+5:30

चांदूर रेल्वे : आर.आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजना स्पर्धेत तालुक्यातील सावंगी संगम हे गाव तालुक्यातून प्रथम आले. त्या ...

Sawangi Sangam first in Sundar Gaon Yojana | सुंदर गाव योजनेत सावंगी संगम प्रथम

सुंदर गाव योजनेत सावंगी संगम प्रथम

चांदूर रेल्वे : आर.आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजना स्पर्धेत तालुक्यातील सावंगी संगम हे गाव तालुक्यातून प्रथम आले. त्या गावाला १० लक्ष रुपये रोख व प्रशस्तीपत्र मंजूर झाले आहे.

ग्रामपंचायतीचे संपूर्ण काम संगणकीकृत व ऑनलाइन करणे, गावातील स्वछता, पाणी पुरवठा, सौरऊर्जेचा वापर, व्यायामशाळा, नदीवर वानराई बंधारे, शोषखड्डे, साथीचे रोग, गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांना अटकाव, स्वच्छता अभियनांतर्गत कामे, पेपर लेस, स्वच्छ पाणी, जनधन योजना लाभार्थी, सुकन्या योजना, एमआरईजीएस अंतर्गत मजुरांना कामे, वृक्ष लागवड, दिवाबत्ती, सुसज्ज शाळा व अंगणवाडी, जलसंधारण, पर्यावरण सुरक्षा आदी अनेक बाबींवर या स्पर्धेत गावातील पाहणी करून गुण देण्यात आले. त्यानुसार गावातील सरपंचा सरीता सुनील राऊत यांनी या योजनेतील निकषांच्या पूर्ततेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Sawangi Sangam first in Sundar Gaon Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.