सखींनी जाणून घेतली स्तन कर्करोगाविषयी माहिती

By Admin | Updated: August 25, 2015 00:27 IST2015-08-25T00:27:27+5:302015-08-25T00:27:27+5:30

आजार म्हटला की रुग्णालयाच्या फेऱ्या, पैशाचा चुराडा, होणारा मन:स्ताप, जीवाची घालमेल व असंख्य यातना यामधून कोणीच सुटले नाही..

Sawane learned about breast cancer | सखींनी जाणून घेतली स्तन कर्करोगाविषयी माहिती

सखींनी जाणून घेतली स्तन कर्करोगाविषयी माहिती

अमरावती : आजार म्हटला की रुग्णालयाच्या फेऱ्या, पैशाचा चुराडा, होणारा मन:स्ताप, जीवाची घालमेल व असंख्य यातना यामधून कोणीच सुटले नाही आणि कॅन्सर म्हटले की मनात अधिकच धडक भरते. परंतु लोकमत सखीमंचने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सखींच्या मनातील कर्करोगाविषयी असणारी भीती घालवली. महिलांना योग्यरितीने मार्गदर्शन केले.
वैष्णवदेवी मंदिर संस्थान व लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक भवनात झालेल्या शिबिरासाठी मुंबईच्या कोकिळाबाई धिरूभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्युटची तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती. डॉ. मंदार नाडकर्णी (ब्रेस कॅन्सर तज्ज्ञ) यांनी सखींना ब्रेड कॅन्सर विषयी सखोल माहिती दिली व सखींच्या शंकांचे निरसन केले. सुप्रोतीम सेना (हृदयविकार तज्ज्ञ) छोट्या मुलांच्या हृदयविकाराविषयी सखींना माहिती दिली तर मनीष पृथ्वी यांनी (आर्थोपेडीक्स एन्कोलॉजीस्ट) यांनी बोन कॅन्सरविषयी विस्तृत माहिती दिली. बऱ्याच सखींनी यावेळी आपले प्रश्न विचारलेत.
सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर मंदार नाडकर्णी (ब्रेस्ट कॅन्सर स्पेशालिस्ट), डॉ. सुप्रोतीम सेन (हार्ट स्पेशालिस्ट), डॉ. मनीष पृथी (आर्योपेडीक एन्कोलॉजीस्ट), डॉ. राजेंद्र पंजाबी नॅचरोपॅथी स्पेशालिस्ट, राहुल शुक्ला पीआरओ, कोकीलाबाई धिरूभाई अंबानी हॉस्पीटल मुंबई, सुशांत दांडगे डीजीएम लोकमत उपस्थित होते.
कार्यशाळेला उपस्थित असलेल्या महिलांनी डॉक्टरांना आपल्या फाईल्स रिपोर्ट दाखवूनही मार्गदर्शन मिळविले. या उपक्रमाबद्दल वाचकांनी ‘लोकमत’चे आभार मानले. कार्यक्रमाचे संचलन डॉ. संगीता रिठे व आभार रवी खांडे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Sawane learned about breast cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.