श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:33+5:302021-01-08T04:36:33+5:30
अमरावती : श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अंजली ठाकरे होत्या. निवृत्त ...

श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती
अमरावती : श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अंजली ठाकरे होत्या. निवृत्त प्राचार्य निर्मला वानखडे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविकात पी.एम. देशमुख व प्राचार्य ठाकरे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. निर्मला वानखडे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या क्रांतिकारी कार्यावर व महिला शिक्षणाविषयी महत्त्व विशद केले. शिक्षकेतर कर्मचारी शंकरराव राऊत, बी.पी.एड.ची विद्यार्थिनी पूजा राहाटे व डी.वाय.एड.चे विद्यार्थी सचिन निचडे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला राजेंद्र डोंगरे, उल्हास देशमुख, पी.एस. सायर, पी.एम. देशमुख, चेतक शेंडे. सुशांत कुकडे या प्राध्यापकांसह नीलेश ठाकरे. स्वाती न्याहाटकर, स्वाती देशमुख, प्रमोद इंगळे, धीरज देशमुख, ज्ञानेश्वर ठाकरे, प्रदीप झामरे हे कर्मचारी उपस्थित होते. पी.एस. सायर यांनी संचालन, तर आभार प्रदर्शन राजेंद्र डोंगरे यांनी केले. चेतक शेंडे व अमृता गुल्हाने यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.