‘तोमोय’च्या जयमाला जाधव यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 16:00 IST2017-07-21T16:00:17+5:302017-07-21T16:00:17+5:30
दिल्ली येथील बाबू जगजीवनराम राष्ट्रीय अकादमीच्यावीतने दिला जाणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार स्थानिक तोमोय स्कूलच्या संस्थापक जयमाला जाधव यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

‘तोमोय’च्या जयमाला जाधव यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार
अमरावती : दिल्ली येथील बाबू जगजीवनराम राष्ट्रीय अकादमीच्यावीतने दिला जाणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार स्थानिक तोमोय स्कूलच्या संस्थापक जयमाला जाधव यांना नुकताच प्रदान करण्यात आला. केंद्रीय आयुक्त भारत सरकार, आदिवासी आयोेग नवी दिल्लीचे श्री.इ.दातीर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढावी, यासाठी अध्ययनात अक्षम विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्यासाठी सुधारोपचारी वर्ग, औषधोपचार, समुपदेशन, वर्तनोपचार, विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करून जयमाला जाधव या त्यांना मदत करीत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.