दररोज वाचवा १० लाख युनिट वीज

By Admin | Updated: October 29, 2014 22:43 IST2014-10-29T22:43:31+5:302014-10-29T22:43:31+5:30

येत्या काळात विजेची समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील नागरिक दरदिवशी रात्री तासभर काळोख ठेवून मेणबत्ती लावतात. हाच प्रयोग अमरावती महानगरात झाला तर दरदिवसाला १० लाख

Save daily 10 million units of electricity | दररोज वाचवा १० लाख युनिट वीज

दररोज वाचवा १० लाख युनिट वीज

अमरावती : येत्या काळात विजेची समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील नागरिक दरदिवशी रात्री तासभर काळोख ठेवून मेणबत्ती लावतात. हाच प्रयोग अमरावती महानगरात झाला तर दरदिवसाला १० लाख युनिट इतकी वीज बचत होईल, असा दावा वीज वितरण कंपनीने केला आहे.
वीज उत्पादनापेक्षा वापर अधिक प्रमाणात होत असल्यामुळे विजेची समस्या गंभीर वळण घेणार आहे. त्यामुळे प्रत्येकानेच वीज वापरात काटकसर करणे आवश्यक झाले आहे. हल्ली अमरावती, बडनेरा शहरात दरदिवसाला १० हजार कोटी युनिट विद्युतचा वापर होत असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड यांनी दिली. वीज चोरी रोखण्यासाठी देखील उपाययोजना सुरू आहेत.
नागरिकांनीच करावे बचतीचे नियोजन
आजच्या परिस्थितीत वीज ही अत्यावश्यक बाब असली तरी वीजेचा वापर कसा कमी करता येईल, याचे नियोजन स्वत: नागरिकांनाच करावे लागणार आहे. घरात अनावश्यक यंत्रे बंद करावेत, दिवे, पंखे, एसी, कुकींगचे साहित्य कमी वापरावे तसेच कमी क्षमतेचे दिवे वापरल्यास विद्युत कमी लागेल. घरी एलईडी, सीएफएलचे दिवे वापरल्यास वीज कमी लागून देयकातही बराच दिलासा मिळेल, असे मोहोड यांनी सांगितले. वीज वापर करणे हे नागरिकांच्या हाती असून भविष्यात वीजेची समस्या गंभीर होऊ नये, यासाठी दरदिवसाला तासभर काळोख ठेवून वीज बचतीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे मोहोड यांनी सांगितले. अनावश्यक विजेचा वापर टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला तर भविष्यात विजेचे संकट ओढावणार नाही, असे विज वितरण कंपनीचे म्हणने आहे.

Web Title: Save daily 10 million units of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.