धामणगावात गुरुवारी होणार सरपंचपदाची सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:51+5:302021-02-05T05:22:51+5:30
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ६२ पैकी ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सोडत गुरुवार, ४ फेब्रुवारी तहसील कार्यालयात काढण्यात येणार ...

धामणगावात गुरुवारी होणार सरपंचपदाची सोडत
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ६२ पैकी ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सोडत गुरुवार, ४ फेब्रुवारी तहसील कार्यालयात काढण्यात येणार असून, यात नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या गटाचे आरक्षण घोषित होणार आहे.
तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीदरम्यान सरपंचपद कुणासाठी राखीव आहे याची सर्वांना प्रतीक्षा लागली होती. तालुक्यातील ६२ पैकी ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारी तहसील कार्यालय काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे.
नऊ गावांतील आरक्षण कायम
तालुक्यातील अनुसूचित जातीकरिता वाघोली, वाटोळा बु, जुना धामणगाव, ढाकुलगाव, तर अनुसूचित जाती महिलांसाठी जळगाव आर्वी, उसळगव्हाण, कळाशी, भातकुली रेणुकापूर या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण कायम राहणार आहे
चार ग्रामपंचायती एसटीसाठी आरक्षित
तालुक्यातील अनुसूचित जमातीसाठी आजनगाव, निंबोली तर महिलांकरिता बोरगाव धांदे, वकनाथ या ग्रामपंचायतचे सरपंचपद यापूर्वीच घोषित करण्यात आले असून, हे आरक्षण कायम राहणार असल्याची माहिती धामणगावचे तहसीलदार गौरवकुमार भळगटीया व नरेश इंगळे यांनी दिली.