शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला मध्य प्रदेशात जायचेय, धारणीवासीयांची मागणी; राष्ट्रपतींना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 15:15 IST

पाच गावांतील सरपंचांनी सीमेवर केले आंदोलन

धारणी (अमरावती) : तालुक्यातील बहुतांश गावे मध्य प्रदेशातील जिल्हा ठिकाणांवरून अवघी ८० किमी अंतरावर आहेत, तर अमरावती मुख्यालयाला जाण्यासाठी किमान दीडशे किमी प्रवास करावा लागतो. त्यातही रस्ते व इतर सुविधा नाहीत. त्यामुळे धारणी तालुक्यातील गावे मध्य प्रदेशात समाविष्ट करावीत, अशी मागणी मेळघाटवासीयांनी राष्ट्रपतींकडे केली. याबाबत शुक्रवारी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर भोकरबर्डी गावाच्या वन तपासणी नाक्यावर पाच गावांमधील नागरिकांनी आंदोलन केले.

कुपोषणाच्या नावावर मेळघाटावर कोट्यवधींचा निधी कुपोषण दूर होऊन आदिवासींचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशाने मेळघाटात विकास योजना गत ३० वर्षांपासून राबविण्यात येत आहे. मात्र, करोडा रुपये खर्च करून सुद्धा मेळघाटातील कुपोषणाची स्थिती कायम आहे. विकासाच्या नावावर आलेला निधी गेला कुठे? हा प्रश्न उपस्थित करीत मेळघाटातील तापी नदी काठालगतच्या गावकऱ्यांनी मध्य प्रदेशची सीमा जवळ असल्यामुळे आमच्या गावांचा समावेश मध्य प्रदेशात करावा, अशी मागणी रेटून धरली आहे.

गावकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्यासह दोन्ही राज्यांतील मुख्य सचिवांना व राज्यपालांना यासंदर्भातील निवेदन दिले आहे. याबाबत मेळघाटाचे आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. १९९४ पासून मेळघाटात कुपोषणाचा उद्रेक झाला. कुपोषणामुळे हजारो बालके दरवर्षी मृत्युमुखी पडतात. हे मृत्यूदर कमी व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने विविध योजना आखून मेळघाटात अपर जिल्हाधिकारी पदाचे कार्यालय स्थापित करून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमला आहे. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून मेळघाटात विकास कामांवर दरवर्षी कोट्यवधींची निधी दिला. त्यानंतरही मेळघाटातील विकासाचे चित्र दयनीय आहे. त्यामुळे सकाळी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील भोकरबर्डी गावाच्या वन तपासणी नाक्यावर परिसरातील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल यांच्या नेतृत्वाखाली मेळघाटातील धारणी तालुका मध्य प्रदेशात समाविष्ट करा, अशी घोषणा देत आंदोलन केले.

'या' गावांतील नागरिकांचा सहभाग

या आंदोलनात भोकरवर्डी, धूळघाट गडगा, खापरखेडा, बेरदा बलडा आणि चिचघाट या पाच गावांतील सरपंच व नागरिकांनी सहभाग घेतला होता. या मागणीमुळे भविष्यात महाराष्ट्र आणि मेळघाटातील सीमावाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

मेळघाटातील चित्र विदारक

मेळघाटातील २४ गावांना अद्यापपर्यंत वीजपुरवठा करण्यास शासन अपयशी ठरले आहे. ७० गावांत मुख्यालयाला जोडणारे रस्ते नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासींना जाण्यासाठी १५० किमी अंतरापर्यत जावे लागते. येथे गेल्यावर काम होण्याची शास्वती नाही. वेळप्रसंगी मुक्काम करावा लागतो. यामुळे आर्थिक झळही सहन करावी लागते. हा खर्च करण्याची आदिवासी बांधवांची ऐपत नाही. त्यामुळे महाराष्ट्रापासून लागलेल्या बुऱ्हाणपूर, खंडवा आणि बैतूल हे तीन जिल्हे केवळ ८० किलोमीटर अंतरावर असून, तासाभरात संपर्क साधला जाऊ शकतो. हे आमच्यासाठी सोयीचे राहणार असल्यामुळे धारणी तालुक्यातील १५४ गावे मध्य प्रदेशात समाविष्ट करावीत, अशी आमची मागणी असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल यांनी केली आहे.

टॅग्स :agitationआंदोलनMelghatमेळघाटAmravatiअमरावती