इर्विन रुग्णालयात सारीने ७३ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:12 IST2021-05-13T04:12:50+5:302021-05-13T04:12:50+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणी नियमित सुरू असून, पॉझिटिव्ह रुग्णांवर सुपर स्पेशालिटीत उपचारार्थ पाठविले जात आहे. मात्र, सारीच्या रुग्णांवर ...

Sari kills 73 patients at Irvine Hospital | इर्विन रुग्णालयात सारीने ७३ रुग्णांचा मृत्यू

इर्विन रुग्णालयात सारीने ७३ रुग्णांचा मृत्यू

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणी नियमित सुरू असून, पॉझिटिव्ह रुग्णांवर सुपर स्पेशालिटीत उपचारार्थ पाठविले जात आहे. मात्र, सारीच्या रुग्णांवर येथील वाॅर्ड नं. ५ मध्ये उपचार सुरू आहे. या रुग्णांना कोरोनासमानच लक्षणे असल्याने ऑक्सिजन लेवल कमी होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी ऑक्सिजनचा मुलबक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी उभारलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकमधून या वाॅर्डाला पुरवठा जोडला गेला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा होत असला तरी रुग्णांकडून उपचाराला प्रतिसाद मिळणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

एप्रिल महिन्यात इर्विन रुग्णालयात जिल्ह्यातील ७४५ रुग्ण सारी आजारावरील उपचारार्थ दाखल झाले. त्यांच्यावर सारीसह अन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ३९५ रुग्ण सारी टु कोविड-१९ त रुपांतर झाले. त्यांवर उपचार करण्यात आले. मात्र, प्रतिसाद न मिळू शकल्याने नऊ जणांना जीव गमवावा लागला. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

बॉक्स

एकाच दिवशी दोन मृत्यू

सारी आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १४ एप्रिल रोजी एकाचा, २० रोजी १, २१ रोजी १, २२ रोजी १, ३० एप्रिलला १, तर २४ आणि २८ एप्रिल रोजी प्रत्येकी २-२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे ७३ अधिक ९ असे एकूण ८२ सारीचे रुग्ण एकाच महिन्यात दगावल्याचा जिल्ह्याला धक्का बसला आहे.

Web Title: Sari kills 73 patients at Irvine Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.