गरीब कन्येच्या विवाहासाठी सप्तरंग, मल्हार ग्रुपचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:12+5:302021-06-01T04:10:12+5:30

नांदगाव पेठ : येथील सप्तरंग क्रीडा मंडळ व डवरगाव येथील रॉयल मल्हार ग्रुप यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार ...

Saptarang, Malhar Group's initiative for marriage of poor girl | गरीब कन्येच्या विवाहासाठी सप्तरंग, मल्हार ग्रुपचा पुढाकार

गरीब कन्येच्या विवाहासाठी सप्तरंग, मल्हार ग्रुपचा पुढाकार

नांदगाव पेठ : येथील सप्तरंग क्रीडा मंडळ व डवरगाव येथील रॉयल मल्हार ग्रुप यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन एका गरीब मुलीचा विवाह थाटात पार पाडला.

प्राप्त माहितीनुसार, डवरगाव येथील रमेशराव उनोने यांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक, त्यात तरुण कन्येच्या विवाहाच्या चिंतेने व्यथित झालेल्या पित्याला सप्तरंग व मल्हार ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आधार दिला. सप्तरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तुळे व मल्हार ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे जमा करून या भगिनीचा थाटात विवाह पार पाडला. स्वप्निल पकडे, जीवन दलाल, शुभम मनवर, कृष्णा देशमुख, रवि कोठार, सचिन नरसिंगकार, दीपक चुळे, व मल्हार ग्रुपचे वैभव गाढवे, श्रेयस गादे, शुभम खैरकार, प्रणव भुजाडे, प्रथमेश गाढवे, यश मकेश्वर आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

===Photopath===

310521\img-20210426-wa0066.jpg

===Caption===

विवाहप्रसंगी शुभेच्छा देतांना सप्तरंग व मल्हार ग्रुप चे पदाधिकारी

Web Title: Saptarang, Malhar Group's initiative for marriage of poor girl