अमरावती : शनिवार दुपारनंतर आलेल्या वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने जिल्ह्याला जबर फटका बसला. सर्वाधिक नुकसान गव्हाचे झाले. ओंबीवरचा गहू झोपला, मृग बहराचीा संत्री गळाली, हरभरा, तुरीच्या गंज्या भिझल्या, कपाशीच्या झाडावरील कापूस भिजला, आंब्याचा मोहोर गळाल्याने मोठे नुकसान झाले. टिनपत्राची छत उडाली. अचानक आलेल्या अकाली पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली, मात्र ३७ अंशांवर असलेला पारा खाली आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आला आहे. शेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालिका सुरू आहे.अचानक वातावरण ढगाळ होऊन सुसाट वारा सूुला अन् मोठ्या थेंबांचा पाऊ स बरसण्यास सुरुवात झाली. वादळाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्ष कोलमडले, खांब वाकलीत, वीज पडून माणसासह गुरेही ठार झाली. अनेकांच्या घरावरची टिनपत्रे उडून गेली. तासभऱ्याच्या या पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान केले. शनिवारपासून सुरू झालेला पाऊ स रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच आहे. अवकाळी पावसाने सरासरी उत्पन्नात कमी येणार आहे. या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येवून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संततधार पावसाने तिवसा तालुक्यात ओंबिवर आलेला गहू पडला. त्यामुळे दाना बारीक होणार आहे. हरभऱ्याच्या गंज्या पावसात ओल्या झाल्यात. तुरीचीही तीच गत आहे. मृगबहराची फळे गळून पडली. विदर्भाचा कॅलिफोर्निया समजले जाणाऱ्या वरुड तालुक्यात संत्रा कलमांचे डोळे खचल्याने नर्सरीधारकांचे प्रचंड नुकसान झाले. मृग बहराची फळे गळाली, गहू, हरभरा, कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. धामणगाव तालुक्यात पावसामुळे दीडशे घरांची पडझड झाली असून आठ गावे काळोखात आहेत. शेतीपिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या वादळाने चांदूरबाजार तालुक्यात आंब्याच्या मोहोराचे नुकसान झाले. संत्रा,गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. दर्यापूर तालुक्यात वादळामुळे अनेक झाडे कोसळल्याने काही रस्ते बंद झाले होते. मेळघाटातही शनिवारपासून तब्बल १७ तास पाऊस झाला. दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होेता. वादळामुळे मेळघाटातील दूरध्वनीसेवा देखिल खंडित झाली असून विद्युत तारा तुटल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरभरा व गहू सोंगून ठेवला होता. परंतु पावसाच्या सरी सोंगून ठेवलेल्या गंजीवर कोसळल्याने शेतमालाचे घरी येण्यापूर्वीच नुकसान झाले. यंदा खरीप हंगामात सुध्दा प्रचंड नुकसान झाले होते. रबीहंगाम तरी तारेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा घातच केला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
संततधार : अतोनात नुकसान
By admin | Updated: March 2, 2015 00:29 IST