शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश रद्द तरीही विद्यार्थ्यांचे शुल्क परत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 19:54 IST

महाविद्यालयांची दादागिरी कोण रोखणार; कुलगुरूंकडून निर्धारित प्रवेश शुल्क  तपासणी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये काही कारणास्तव विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास त्यांचे शुल्क परत केले जात नाही, हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. एकाच शाखेच्या प्रवेशासाठी विविध महाविद्यालयांत वेगवेगळे प्रवेश शुल्क आकारले जात असल्याप्रकरणी चौकशीलादेखील सुरुवात झाली आहे.विद्यापीठाने व्यावसायिक, विनाअनुदानित आणि अनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांची कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून नियमावलीदेखील ठरली आहे. असे असताना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३८३ महाविद्यालयांमध्ये एकाच शाखेच्या प्रवेशासाठी वेगवेगळे शुल्क घेतले जात असल्याची बाब महाविद्यालयांच्या माहिती पुस्तिकेवरून स्पष्ट होत आहे. एखाद्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात घेतलेले प्रवेश वैयक्तिक अथवा पालकांच्या बदली कारणांनी ते रद्द केल्यास त्या विद्यार्थ्यांना शुल्काचे नावे घेतलेली रक्कम परत करण्यात येत नाही. एवढेच नव्हे तर प्रवेशाच्यावेळी डोनेशन, विविध शुल्क घेतले जाते. ही रक्कमदेखील प्रवेश रद्द झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना परत केली जात नाही. 

विद्यापीठ नियमानुसार काही कारणास्तव विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास त्याचेकडून शुल्काच्या नावे घेतलेल्या रक्कमेतून जुजबी रक्कम महाविद्यालयाने घेऊन उर्वरित रक्कम परत करणे अनिवार्य आहे. मात्र, प्रवेश रद्द झाल्यामुळे महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले. महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ प्रवेश रद्द करण्यास परवानगी देत नाही. नवीन प्रवेश कुठून आणावे अशा विविध कारणांची यादी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांपुढे प्राचार्यांमार्फत ठेवली जाते. या प्रकाराला अनेक विद्यार्थी बळी पडले आहेत.     महाविद्यालयांमध्ये शुल्क आकारणीच्या रक्कमेबाबत तक्रार प्राप्त झाली आहे.  विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्यानंतरही शुल्क परत केले जात नाही. याबाबत तक्रारकर्त्यांनी एखाद्या महाविद्यालयाचे उदाहरण पुराव्यानिशी देणे आवश्यक आहे. याप्रकरणी चौकशी पूर्ण करून कुलगुरुंना अहवाल सादर केला जाईल.-  राजेश जयपूरकर,प्र- कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ      विद्यापीठाने महाविद्यालयांचे माहिती पुस्तिका मागवावी. यात प्रवेशाचे शुल्कात तफावत असल्याची बाब निदर्शनास येईल. महाविद्यालयांना प्रवेश शुल्कात वाढ करायची असल्यास त्यासाठी विद्यापीठातून परवानगी घ्यावी. परस्पर प्रवेश शुल्कात वाढ आणि प्रवेश रद्द झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना रक्कम परत न करणे ही फसवणूक आहे.- दिनेश सूर्यवंशी,  व्यवस्थापन परिषद सदस्य, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थीEducationशिक्षण