संत अच्युत महाराज तृतीय पुण्यस्मरण सोहळा'
By Admin | Updated: December 18, 2015 00:25 IST2015-12-18T00:25:31+5:302015-12-18T00:25:31+5:30
येथून अवघ्या सात किमी अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र बोरगाव (धर्माळे) येथील श्री संत अच्युत महाराज ज्ञानपीठ परिसरात श्री संत अच्युत महाराज....

संत अच्युत महाराज तृतीय पुण्यस्मरण सोहळा'
बोरगाव येथे सोहळा : ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीत रंगले बोरगाव
अमरावती : येथून अवघ्या सात किमी अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र बोरगाव (धर्माळे) येथील श्री संत अच्युत महाराज ज्ञानपीठ परिसरात श्री संत अच्युत महाराज यांचा तृतीय पुण्यस्मरण सोहळा विविध आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी ५ ते १३ डिसेंबर या कालावधीत पार पडला.
यावेळी भावार्थ संगीत, रामायण, कीर्तन, प्रवचन, नेत्रतपासणी, नेत्र शस्त्रक्रिया व नेत्रदान, तंबाखुमुक्त अभियान तसेच हृदयरोग, होमिओपॅथी रोगनिदान व रक्तदान शिबिरांना परिसरातील गरीब व गरजू रुग्णांची गर्दी जमली होती. विश्वरचना ग्रामीण विकास संस्था, केकतपूर, सलाम मुंबई फाऊंडेशन व नरोत्तम सेक्सारिया फाऊंडेशन मुंबई, श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती, डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती पं. जवाहरलाल नेहरू होमिओ कॉलेज, अमरावी, श्री तखतमल होमिओ कॉलेज अमरावती, महात्मे आय हॉस्पिटल नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुंनी यातील विविध आरोग्य शिबिरांना हजेरी लावून रुग्णसेवेचा अभिनव उपक्रम राबविला.
भजन, कीर्तन, प्रवचन व गीत गायन कार्यक्रमात हभप बाबाराव उमाळे, भाऊराव धर्माळे, त्र्यंबकराव माहोरे व संचांचे संगीत भावार्थ रामायण, श्री संत अच्युत महाराज भजन मालिकेवरील श्रीमती उषा हुसे, प्रमोद हुसे यांचे शास्त्रीय गायन, प्राचार्य अरविंद देशमुख यांचे प्रवचन, नवना कडू, व सचिन देव यांचे मातृपितृ पूजनावरील व्याख्यान, हभप देवीदास सावरकर व संच यांनी सादर केलेली संत अच्युत महाराज भजनावली, संत प्रभाकर महाराज (येलकी पूर्णा) यांचे हरिकीर्तन, रघुनाथ कर्डीकर व संच यांनी महाराजांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली.
या पुण्यस्मरण सोहळ्यास आमदार यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा, माजी आमदार जगदीश गुप्ता, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा ठाकरे, सरपंच कोकीळा आठवले, माजी सरपंच नरेश माहोरे, संत अच्युत महाराज सत्संग मंडळ, मुंबईचे सहसचिव अनंत धर्माळे, संत अच्युत महाराज संस्थान, शेंदूरजना बाजारचे अध्यक्ष अनिल सावरकर, दिलीप जाणे, श्रीरंग ढोके, अशोक भोयर, विनय पांडे, गोकुलदास सारडा, किरण जाजू, सुनील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन मुख्याध्यापिका अनिता काळे यांनी केले. (प्रतिनिधी)