अंजनगाव बाजार समितीच्या सभापतीपदी संजय रोहणकर

By Admin | Updated: September 22, 2015 00:20 IST2015-09-22T00:20:10+5:302015-09-22T00:20:10+5:30

स्थानिक बाजार समिती सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे संजय रोहणकर सभापतीपदी व शामसुंदर गायगोले उपसभापतीपदी प्रत्येकी तेरा मतांनी विजयी झालेत.

Sanjay Rohankar as the Chairman of Anjangaon Market Committee | अंजनगाव बाजार समितीच्या सभापतीपदी संजय रोहणकर

अंजनगाव बाजार समितीच्या सभापतीपदी संजय रोहणकर

निवडणूक : परिवर्तनच्या हाती सत्ता, नवख्यांना संधी
अंजनगावसुर्जी : स्थानिक बाजार समिती सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे संजय रोहणकर सभापतीपदी व शामसुंदर गायगोले उपसभापतीपदी प्रत्येकी तेरा मतांनी विजयी झालेत. त्यांच्या विरोधात सहकार पॅनेलच्या संचालकांनी तक्रार केली होती. पण निवडणूक अधिकारी बलिंगे यांनी ती फेटाळून लावली. व्यापारी मतदार संघाचे दोन व हमाल मतदारसंघाच्या एका संचालकानेसुध्दा हात वर करुन परिवर्तन पॅनेला खुला पाठिंबा घोषित केला. हे या निवडणुकीचे वैशिष्ट राहिले. परिवर्तन पॅनेलमध्ये सभापतीपदासाठी बंडखोरी होईल, हा अंदाज सपेशल खोटा ठरला. आपल्याला हे पद मिळावे, असे बहुमतातील गटात असलेल्या संचालकांना वाटणे साहजिकच होते. पण ज्या पद्धतीने हा विजय प्राप्त झाला, त्यानुसार व मतदारांच्या भावनांना लक्षात घेऊन परिवर्तन पॅनेलच्या संचालकांनी आपला गट बंडखोरीपासून अलिप्त ठेवला. शेवटपर्यंत या गटाला छेद देण्याचे अनेक प्रयत्न झालेत. गुप्त मतदान मागण्याची मागणी हा त्यातलाच एक भाग होता. सभापती निर्वाचित झालेले संजय रोहणकर हे अडगाव खाडे येथील सरपंचसुध्दा आहेत.
ग्रामपंचायत मतदारसंघातूून ते विजयी झाले होते. शामसुंदर गायगोले हे युवक काँग्रेसचे राज्य पदाधिकारी असून वनोजाबाग येथील रहिवासी आहेत. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या रुपाने बाजार समितीला उमदे युवा नेतृत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या हाती सत्ता देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sanjay Rohankar as the Chairman of Anjangaon Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.