संजय निपाणे नवे महापालिका आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:51 IST2018-06-12T23:51:18+5:302018-06-12T23:51:27+5:30

ठाणे महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले संजय निपाणे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. मंगळवारी सायंकाळी नगरविकास विभागाने काढलेले निपाणे यांच्या नेमणुकीचे आदेश महापालिकेत धडकले. निपाणे यांची नेमणूक महापालिका आयुक्त म्हणून झाली असताना मावळते आयुक्त हेमंत पवार यांच्या बदलीबाबत नगरविकास विभागाने कुठलेही आदेश काढले नाहीत.

Sanjay Nipane New Municipal Commissioner | संजय निपाणे नवे महापालिका आयुक्त

संजय निपाणे नवे महापालिका आयुक्त

ठळक मुद्देआज रुजू होणार : पवारांची बदली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ठाणे महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले संजय निपाणे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. मंगळवारी सायंकाळी नगरविकास विभागाने काढलेले निपाणे यांच्या नेमणुकीचे आदेश महापालिकेत धडकले. निपाणे यांची नेमणूक महापालिका आयुक्त म्हणून झाली असताना मावळते आयुक्त हेमंत पवार यांच्या बदलीबाबत नगरविकास विभागाने कुठलेही आदेश काढले नाहीत. मात्र, ते त्यांच्या महसूल या पालकविभागात रुजू होण्याचे संकेत आहेत. पवार यांचा कार्यकाळ १७ मे २०१६ ते १२ जूनपर्यंत राहिला. दरम्यान नवे आयुक्तांनी १३ जून रोजीच अमरावतीला रुजू होण्याचे निर्देश सरकारने दिल्याने ते बुधवारी रुजू होण्याची शक्यता आहे. ते अमरावती जिल्ह्यातील मूळ रहिवाशी आहेत. त्यांनी अमरावती विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी यापूर्वी चिखलदरा न.प.मध्ये काम केले आहे.

Web Title: Sanjay Nipane New Municipal Commissioner