संजय खोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:59 IST2018-09-14T21:58:50+5:302018-09-14T21:59:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजय खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे प्रसिद्धी माध्यम समन्वय व राजकीय विश्लेषण ही जबाबदारी प्रामुख्याने सोपविली आहे.

Sanjay Khodke NCP's Vice President of the State | संजय खोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष

संजय खोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजय खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे प्रसिद्धी माध्यम समन्वय व राजकीय विश्लेषण ही जबाबदारी प्रामुख्याने सोपविली आहे.
संजय खोडके हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत एकनिष्ठ राहीले आहेत. मध्यंतरी काही कारणास्तव त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले. मात्र, राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या विशेष उपस्थितीत खोडके यांनी त्यांच्या काही निवडक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँंगे्रसमध्ये प्रवेश घेतला. खोडके यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देताना त्यांच्याकडे पक्षबांधणीची धुरा सोपविली आहे. राष्ट्रवादीला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी खोडकेंना बळ दिल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी प्रमुख नेते खोडके यांच्या पाठीशी उभे झाले आहेत. खोडकेंच्या पक्षबांधणीतून जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या घडाळ्याची टिकटिक वेग घेईल, असे संकेत आहेत. त्यानुसार खोडकेंनी पक्ष बांधणीसाठी जिल्हाभरात दौऱ्यांचे सत्र सुरू केले आहे. नवीन-जुन्या नेत्यांना सोबत घेत पक्षबांधणी करीत आहेत.

Web Title: Sanjay Khodke NCP's Vice President of the State