शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अन् रेती तस्कराने सहायक पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातला ट्रक! रहाटगावजवळचा थरार

By प्रदीप भाकरे | Updated: November 30, 2022 18:08 IST

ट्रकसोबत नेले फरफटत : दोघांना अटक, एक पसार

अमरावतीरेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने त्याचा ट्रक थेट सहायक पोलीस निरीक्षकांच्या अंगावर नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना अर्जुननगर ते पीडीएमसी दरम्यानच्या मार्गावर बुधवारी सकाळी ७.३५ वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून शोएब अहमद एजाज (रा. आझादनगर), रेहान शेख गुलाब शेख (रा. सबा नगर) व अहफाज अहमद (रा. आझादनगर) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला. पोलिसांनी शोएब अहमद व ट्रक चालक रेहान शेख यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, तो ट्रक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगेश इंगळे यांना रेती तस्कराने ट्रकसोबत काही अंतर फरफटत देखील नेले.

पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे व पथकातील अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना, त्यांनी गुप्त माहितीवरून एमएच ४८ एजी २४१६ या क्रमांकाच्या ट्रकला अर्जुननगरजवळ थांबण्याचा इशारा दिला. परंतू चालकाने ट्रक थांबविला नाही. त्यामुळे एपीआय इंगळे यांनी पाठलाग केला. ट्रकचालकाने ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून इंगळे बाजुला सरकले. त्यांनी ट्रकची एक हुक पकडत कॅबिनमधील चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालक रेहान शेखने ट्रक दामटल्याने इंगळे हे ट्रकसोबत फरफटत गेले आणि त्यानंतर चालकाने काही अंतरावरील कृषी अनुसंधान केंद्राजवळ ट्रक थांबविला. त्यावेळी तेथे पोहोचलेल्या शोएब अहमदने एपीआय इंगळे यांच्याशी हुज्जत घातली. ट्रक कसा नेता, ते पाहतो, अशी धमकी देत त्याने सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला.

पंचनाम्याची कागदपत्रे फेकली

दरम्यान, पोलिसांसमोर तलाठी आर. पी वानखडे व मंडळ अधिकारी यशवंत चतुर हे घटनास्थळी पंचनामा करीत असता, ट्रकमध्ये उपस्थित असणाऱ्या शोएब अहमदने मंडळ अधिकारी व तलाठी यांना धमक्या देऊन भाऊ अहफाज अहमदला कॉल करून बोलावून घेतले. काही वेळातच अहफाज अहमद घटनास्थळी पोहोचला. त्याने पंचनाम्याचे कागदपत्रे हिसकावली. मारण्याच्या उद्देशाने तो महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांना मारहाण करून हुज्जतबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न सुरु केला असता, अहफाज अहमद तेथून पसार झाला, शोएब अहेमद व रेहान शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ट्रक जप्त केला.

याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूध्द प्राणघातक हल्ला व शासकीय कामकाजात अडथळा असा गुन्हा नोंदविला.

योगेश इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक, विशेष पथक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSmugglingतस्करीArrestअटकAmravatiअमरावतीPoliceपोलिस