पूर्णा नदी पात्रात वाळू माफियांचे राज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST2021-03-21T04:13:04+5:302021-03-21T04:13:04+5:30

नरेंद्र जावरे परतवाडा : अमरावती मार्गावरील आसेगाव परिसरातून वाहणाºया पूर्णा नदीच्या पात्रातून लाखो रुपयांच्या वाळूची चोरी केल्या जात ...

Sand mafia rule in Purna river basin! | पूर्णा नदी पात्रात वाळू माफियांचे राज!

पूर्णा नदी पात्रात वाळू माफियांचे राज!

नरेंद्र जावरे

परतवाडा : अमरावती मार्गावरील आसेगाव परिसरातून वाहणाºया पूर्णा नदीच्या पात्रातून लाखो रुपयांच्या वाळूची चोरी केल्या जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने शुक्रवारी उघडकीस आणताच वाळू माफियांसह महसूल घशात घालणाºयांच्या तंबूत खळबळ उडाली आहे.

भातकुली तालुक्यातील पोहरा पुर्णा परिसरातील रेती घाटाचा लिलाव घेतल्यानंतर अचलपूर तालुक्यातील येलकी व इतर परिसरातून बिनबोभाटपणे रेतीचोरीचा व्यवसाय दिवसाढवळ्या सुरू असल्याचा प्रकारच एका तक्रारीनंतर महसूल विभागाने केलेल्या कारवाईत उघड झाला. दरम्यान रेती घाटांची सुरक्षा वाºयावर सोडण्यामागे हप्तेखोरी असल्याची मोठी चर्चा आहे.

तक्रारीनंतर पाच ट्रक पकडण्यात आले. तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रेतीसाठी केलेल्या खोदकामाचे मोजमाप मात्र करण्यात आले नाही. त्यामुळे नदीपात्रातून शेकडो ब्रास लाखो रुपयांच्या रेतीची चोरी झाली आहे. त्यासंदर्भात अजूनही कुणावरच दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई झाली नाही हे विशेष.

बॉक्स

नियम धाब्यावर

रेतीघाटासंदर्भातील सर्व नियम घाट मालकाने धाब्यावर बसविले. तर महसूल प्रशासनाने त्याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप होत आहे. घाटावर कुठल्याच प्रकारचे सीसीटीव्ही लावण्यात आले नाहीत. तर दोन घाटातील अंतर २०० मीटर ठेवणे आवश्यक असताना येलकी व पोहरा गावाच्या सीमारेषेपासूनच वाट्टेल तसे खड्डे करून रेती काढण्यात आली.

महसूल आणि गाव पथके गेली कुठे?

रेती चोरी थांबवण्यासाठी गाव पातळी ते महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी अशी अशी वेगवेगळी पथके आहेत. पूर्णा नदीपात्रासह ठिकठिकाणी मोठे खड्डे करून दिवस-रात्र सुरू असलेल्या रेती चोरीवर बोटावर मोजण्याइतपत कारवाया सोडल्या तर हप्तेखोरीतून सर्व आॅल वेल सुरू असल्याचे चित्र आहे.

बॉक्स

‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ

पुर्णा नदी पात्रासह अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील नदी नाल्यांमध्ये वाळूमाफियांनी सर्रास रेती चोरीचा व्यवसाय चालविला आहे. शनिवारी ‘लोकमत’ंने वाळूमाफियांसदर्भात वृत्त प्रकाशित करताच, हप्ते खोरी करून महसूल खिशात घालणाºया काही अधिकारी कर्मचाºयांमध्ये मोठी खळबळ उडाली.

पान ३ चे लिड

Web Title: Sand mafia rule in Purna river basin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.