महिला व बालविकास मंत्र्यांकडून सॅल्यूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:04 IST2021-08-02T04:04:09+5:302021-08-02T04:04:09+5:30

फोटो पी ०१ यशोमती पान ३ मस्ट अमरावती : पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण ...

Salute from the Minister of Women and Child Development | महिला व बालविकास मंत्र्यांकडून सॅल्यूट

महिला व बालविकास मंत्र्यांकडून सॅल्यूट

फोटो पी ०१ यशोमती

पान ३ मस्ट

अमरावती : पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत असतो. मात्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या ताफ्यातील वाहनचालक मारुती किन्हाके यांना सॅल्यूट करीत त्यांच्या अविरत प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मारुती किन्हाके १९८९ साली पोलीस दलात रुजू झाले. दोन वर्षांपासून ते महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत होते. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचे चालक या निमित्ताने ते सारथ्य करीत होते. त्यांच्या शासकीय कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांचं औक्षण करून तसेच त्यांना शाल-श्रीफळ देऊन त्यांचा गौरव ना. ठाकूर यांनी केला तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुती किन्हाळे यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना ठाकूर यांनी सॅल्यूट केला तसेच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

Web Title: Salute from the Minister of Women and Child Development