चोरलेल्या दुचाकींची मेळघाटात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST2021-03-20T04:12:14+5:302021-03-20T04:12:14+5:30
चिखलदरा : मध्य प्रदेशातील एका चोराने दुचाकी चोरी करून मेळघाटात आदिवासींच्या घरी ठेवल्या. सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी ...

चोरलेल्या दुचाकींची मेळघाटात विक्री
चिखलदरा : मध्य प्रदेशातील एका चोराने दुचाकी चोरी करून मेळघाटात आदिवासींच्या घरी ठेवल्या. सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतल्या असून, त्या चोरांचा शोध चालविला आहे.
तालुक्यातील काटकुंभ चौकीतील चुरणी परिसरात भोळ्याभाबड्या आदिवासींना कागदपत्रे दाखवून चोरीच्या गाड्या त्यांच्या घरी ठेवण्यात आल्या. प्रत्यक्षात सदर तीन दुचाकी संशयास्पद असल्याने चिखलदरा पोलिसांनी त्या जप्त केल्या. त्या दुचाकी त्यांच्या घरी आणून ठेवणाऱ्या मध्यप्रदेशातील त्या चोराचा शोध सुरू केला आहे.
सदर दुचाकी कुणाच्या?
जिल्ह्यातील इतर कुठल्या पोलीस ठाण्यात त्यासंदर्भात तक्रार आहे का, याचा संपूर्ण तपास स्थानिक पोलिसांनी चालविला आहे. दुचाकी घरी ठेवणाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास चिखलदऱ्याचे ठाणेदार राहुल वाढवे, काटकुंभ चौकीचे जमादार भारती, रूपेश शिंगणे, पवन सातपुते आदी करीत आहेत.
बॉक्स
महाराष्ट्र-मध्य प्रदेश कनेक्शन
अमरावती, परतवाडा, मोर्शी, वरूड या मध्य प्रदेशच्या सीमेवरील शहरांसह ग्रामीण भागातून दुचाकीचोरी करून ते मध्य प्रदेशात पळ काढत असल्याचा प्रकार यापूर्वी परतवाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाला होता. मेळघाटातील भोळ्याभाबड्या आदिवासींना चोरीच्या दुचाकी विकण्याचा हा डाव असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.दुचाकीचोरांची मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणात शिवम देवमन धोत्रे (२०, चुरणी), दिनेश नंदुलाला बावणे (३५, रा. चितवाडा जोडी, मध्यप्रदेश), नेहरू तुळशीराम सुरजे यांना रात्री संशयास्पद फिरताना आढळल्याने ताब्यात घेण्यात आले आहे.
कोट
काही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी मेळघाटात आणणारा मध्यप्रदेशातील संबंधित इसम कोण, याचा तपास सुरू आहे.
- राहुल वाढवे, ठाणेदार, चिखलदरा
--------------------
पान २ ची बॉटम