भरारी पथकासमक्ष बियाण्यांची विक्री
By Admin | Updated: June 8, 2016 00:13 IST2016-06-08T00:13:11+5:302016-06-08T00:13:11+5:30
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच बळीराजा आपल्या काळया आईसाठी बियाणे खरेदीच्या तयारीला लागला आहे.

भरारी पथकासमक्ष बियाण्यांची विक्री
पेरणीची तयारी : काळाबाजार रोखण्यासाठी पथक
परतवाडा : मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच बळीराजा आपल्या काळया आईसाठी बियाणे खरेदीच्या तयारीला लागला आहे. बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक निश्चित केले आहे. अचलपूर येथील अग्रवाल कृषी केंद्रातून थेट या पथकासमक्षच शेतकऱ्यांना बियाणे विक्री करण्यात आले.
शेतकऱ्यांची आर्थीक लुट बियाण्यांपासून सुरुवात होत असल्याने भरारी पथकाच्या सहाय्याने जिल्हाभरातील कृषी केंद्रांची तपासणी सुरू आहे. जिल्हा गुण नियंत्रक पुरुषोत्तम कडू, जिल्हा कृषी अधिकारी वरुड देशमुख, तालुका भरारी पथक प्रमुख, प्रफुल्ल सातव, पंचायत समिती कृषी अधिकारी राम देशमुख यांनी तालुक्यातील काही कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना माफक दरात बियाणे वाटप करण्यात आले. गुप्त माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली. दुसरीकडे शेतकऱ्यांनी एकाच वाणासाठी आग्रह न धरता बाजारात उपलब्ध इरतही कंपनीच्या बियाण्यांची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)