बनावट शिक्क्याद्वारे गौण खनिजाची विक्री
By Admin | Updated: January 23, 2017 00:01 IST2017-01-23T00:01:05+5:302017-01-23T00:01:05+5:30
बनावट शिक्क्याद्वारे गौणखनिजांची चोरी-विक्री करणाऱ्या वाहनमालकांची टोळी जेरबंद करण्यात पोलीस, महसूल विभागाला यश आले आहे.

बनावट शिक्क्याद्वारे गौण खनिजाची विक्री
गुन्हे दाखल : नागरिकांची फसवणूक, शासनाचा महसूल बुडीत
अमरावती : बनावट शिक्क्याद्वारे गौणखनिजांची चोरी-विक्री करणाऱ्या वाहनमालकांची टोळी जेरबंद करण्यात पोलीस, महसूल विभागाला यश आले आहे. मागील काही वर्षांपासूनहा प्रकार सुरू होता. नांदगाव पेठ पोलिसांनी दोन वाहन मालकांवर गुन्हे नोंदविले आहे.
सम्राट सरोदे व गौरव ढवळी अशी गुन्हे दाखल झालेल्या वाहनमालकांची नावे आहेत. १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पोलीस नागपूर महामार्गावर सिटीलॅण्डसमोर वाहनांची तपासणी करीत असताना गौणखनिज वाहतूक करणारी १० वाहने ताब्यात घेतली. वाहनांची कागदपत्रे तपासल्यानंतर ही वाहने नांदगाव पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी महसूल विभागाला पत्र पाठवून वाहनांसह गौणखनिजांची जप्ती, पंचनामा करण्याचे कळविले. त्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. १३ ते १६ जानेवारी दरम्यान जप्ती पंचनामे, खदान मालकांकडून रॉयल्टी पासबूक, स्थळप्रत तपासण्यात आली. मात्र, रॉयल्टी पासबुक प्रत क्र. ११९२ व १३५५ स्थळप्रतीमध्ये तफावत आढळून आली. आठ वाहनांची मूळ कागदपत्रे व रॉयल्टी पासमध्ये तफावत नसल्याने ही वाहने मुक्त करण्यात आली. मात्र एम.एच.-१२, ई एफ- ८१००, एम.एच. ०४ डी.के- ४२८७ या दोन वाहनांमध्ये रॉयल्टी पासमध्ये खोडतोडीप्रकरणी वाहनमालकांचे बयाण नोंदविले. खदान मालकाकडून देण्यात येणाऱ्या रॉयल्टी पासवर उपलब्ध शिक्क्याद्वारे खोडतोड केल्याचे वाहनमालकांनी सांगितले. याआधारे वाहनमालकांकडून ७० हजार ९९२ रुपये दंड वसूल केला. मात्र महसूल विभागाच्या नियमानुसार गौण खनिजाची चोरी करणे, बनावट शिक्के बनवून गौणखनिजांची चोरी, अवैध गौणखनिज वाहतूक, शासन दस्तऐवजात हेराफेरी, शासनाची फसवणूक व गौणखनिज विकत घेणाऱ्यांची फसवणूकप्रकरणी भादंविच्या ४२०, ४६४, ४६५, व ४७१ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
बनावट शिक्क ्याद्वारे शासनाचा महसूल बुडविला आहे. नागरिकांची फसवणूक देखील झाली आहे. वाहनमालकांच्या बयाणानुसार चौकशीअंती खदानमालकावरही गुन्हे दाखल करु.
- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती