सालबर्डीत तगडा बंदोबस्त
By Admin | Updated: February 18, 2015 00:11 IST2015-02-18T00:11:40+5:302015-02-18T00:11:40+5:30
सालबर्डी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात उपाय सूचविले असून यात्रा महोत्सव २२ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

सालबर्डीत तगडा बंदोबस्त
अमरावती : सालबर्डी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात उपाय सूचविले असून यात्रा महोत्सव २२ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.
बैतुलचे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर बी. पाटील यांनी भाविकांसाठी, मेडीकल टीम, अग्नीशमन यंत्र आदि व्यवस्था उपलब्ध करुन दिले आहे. पिण्याचे पाणी, प्रकाशची व्यवस्था करण्यात आली आहे. अवैध मद्यविक्रीला प्रतिबंध करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली आहे. दरवर्षी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते. नागरिकांना देखील सुरक्षेचे उपाय अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व्यवस्थीत दर्शन घेता यावे यासाठी आवश्यक सर्व ठिकाणी बॅरीकेटींग करण्यात आले आहे. धोक्याच्या ठिकाणी सुचना फलक लावण्यात आले आहे. यात्रेच्या ठिकाणी वैद्यकिय चमु व रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. पाण्याच्या डोहाच्या ठिकाणी जिवरक्षक (गोताखोर) ठेवण्यात आलेले आहे. अग्नीशामक दल याशिवाय अचानकपणे कोणतेही संकट उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी किंवा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पथक तैनात ठेवण्यात आलेले आहे. यात्रा स्थळावर पिण्याच्या पाण्यासह फिरती शौचालय, रात्रीच्यावेळी प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे.बेकायदेशिर दारु विक्री तसेच जुगाराच्या वाईट प्रथा सक्तीने बंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहे. यात्रा परिसरातील संपुर्ण सुरक्षा व्यवस्थेच्या निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.