जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन सीएमपी ऑनलाईन प्रणालीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST2021-03-01T04:15:20+5:302021-03-01T04:15:20+5:30

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी ऑनलाईन प्रणाली लागू करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. ...

Salary of Zilla Parishad teachers through CMP online system | जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन सीएमपी ऑनलाईन प्रणालीने करा

जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन सीएमपी ऑनलाईन प्रणालीने करा

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी ऑनलाईन प्रणाली लागू करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे. सीएमपी ऑनलाईन प्रणाली लागू झाल्यास महिन्याच्या १ तारखेलाच शिक्षकांना वेतन मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन देयके दर महिन्याला १५ ते २० दिवस विलंबानेच होत आहेत. आजमितीला शिक्षकांचे जानेवारीचे वेतन मार्च महिन्यात होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना शिक्षकांच्या वेतनासाठी ऑनलाईन सीएमपी प्रणालीचा अवलंब झाल्यास शिक्षकांना नियमित १ तारखेला वेतन अदा होण्यात कोणतीही अडचण राहणार नाही. जालना, उस्मानाबाद या जिल्हा परिषदमध्ये सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा केले जाते. त्याप्रमाणे अमरावती जिल्हा परिषदेने या प्रणालीचा अवलंब करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक लि. ही बँक पगार वितरणापोटी शासनाकडून कुठल्याच प्रकारचा मोबदला न घेता शिक्षकांचे वेतन तथा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन वितरणाचे काम करीत आहे. सीएमपी प्रणालीकरिता जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक ही समन्वयकाची भूमिका पार पाडू शकते, असे निवेदनातून शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, संभाजी रेवाळे, मनीष काळे, राजेश सावरकर, सरिता काठोळे, योगिता जिरापुरे, सुषमा वानखडे, भावना ठाकरे, प्रविणा कोल्हे यांनी केली आहे.

Web Title: Salary of Zilla Parishad teachers through CMP online system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.