अचलपूर पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:12 IST2021-02-07T04:12:12+5:302021-02-07T04:12:12+5:30
तीन महिन्यांपासून वेतन नाही, भविष्य निर्वाह निधी थकीत परतवाडा : अचलपूर नगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षकांपाठोपाठ कर्मचाऱ्यांचेही वेतन रखडले आहे. ...

अचलपूर पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
तीन महिन्यांपासून वेतन नाही, भविष्य निर्वाह निधी थकीत
परतवाडा : अचलपूर नगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षकांपाठोपाठ कर्मचाऱ्यांचेही वेतन रखडले आहे. तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षकांसह कर्मचारीही आर्थिक विवंचनेत आहेत.
नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्याच्या थकीत वेतनासह मागील १५ महिन्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे १ कोटी ७० लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या त्या खात्यात नगर परिषदेने वळते केलेले नाही. पगाराअभावी त्रस्त या कर्मचाऱ्यांनी ४ फेब्रुवारी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच या कर्मचाऱ्यांनी साडेतीन तास ठिय्या दिला. यादरम्यान दुपारी २.३० वाजता कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. आपल्या न्याय्य मागण्या त्यांच्यापुढे ठेवल्यात. यात अनुदानाअभावी मुख्याधिकाऱ्यांनी आपली हतबलता व्यक्त केली, तर प्राथमिक शिक्षकांच्या शिष्टमंडळानेही मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. अचलपूर नगरपालिकेच्या २५ प्राथमिक शाळांमधील ११६ प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाची समस्या त्यांनी मुख्याधिकाऱ्यांसमक्ष ठेवली या शिक्षकांनाही मागील तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. शिक्षकांच्या नियमित वेतनासह मार्च महिन्यातील २५ टक्के वेतन, डीएचा फरक शिक्षकांना मिळालेला नाही. मागील २४ महिन्यांचे भविष्य निधीचे जवळपास दोन कोटी रुपये भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वळते केलेले नाही.
कोट
अनुदानाअभावी कर्मचाऱ्यांचे, शिक्षकांचे पगार थांबले आहेत. शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. अनुदान प्राप्त होताच थकीत वेतन करण्यात येईल.
_- राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, नगर परिषद, अचलपूर