सखी मंच सदस्यांचा ‘लकी ड्रॉ’

By Admin | Updated: March 13, 2017 00:18 IST2017-03-13T00:18:35+5:302017-03-13T00:18:35+5:30

लोकमत वृत्तपत्राच्या वाचक वर्गणीदार असलेल्या सखीमंच सदस्यांचा लकी ड्रॉ स्थानिक वीरसेन मंगलम् येथे बुधवार ८ मार्च रोजी पार पडला.

Sakhi forum members 'lucky draw' | सखी मंच सदस्यांचा ‘लकी ड्रॉ’

सखी मंच सदस्यांचा ‘लकी ड्रॉ’

बक्षिसांचे वितरण : लोकमत वाचक, वर्गणीदारांची उपस्थिती
अंजनगाव सुर्जी : लोकमत वृत्तपत्राच्या वाचक वर्गणीदार असलेल्या सखीमंच सदस्यांचा लकी ड्रॉ स्थानिक वीरसेन मंगलम् येथे बुधवार ८ मार्च रोजी पार पडला. ओमशांती आध्यात्मिक सेंटरच्या संचालिका दुर्गा व विजया संगई यांचे हस्ते सखीमंच सदस्यांना विविध बक्षिसांचे वाटप याप्रसंगी करण्यात आले. ज्या सखीमंच सदस्या लोकमत वृत्तपत्राच्या वर्षभर वाचक आणि वर्गणीदार असतात त्यांना दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिनी बक्षिसांचे वाटप करण्यात येते. यावर्षी छाया राजेंद्र रंदे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून गॅस शेकडीचे वाटप अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
द्वितीय क्रमांकाचे अकरा साड्यांचे बक्षीस सुनिता पुरी, मनीषा पांढरकर, स्वाती किचंबरे, उषा गुजर, शुभांगी महाजन, श्रद्धा धारस्कर, वैशाली बोबडे, पल्लवी भांबूरकर, कविता बोराडे, वैशाली वाटाणे, शारदा मानकर यांना देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे आकर्षक भेटवस्तूची एकवीस बक्षिसे रोहिणी काळे, शालिनी बेलसरे, प्रांजली हुड, संगीता लवटे, संगीता काळे, वनिता घोडे, महानंदा फाटे, प्रवीणा भोपळे, अंशुमती कहाणे, मंगला वाघमारे, साधना लेंधे, ललिता राऊत, रेखा अग्रवाल, सपना पवार, जयश्री गुजर, सविता झाडे, शिल्पा काळे, सारिका मुधोळकर, सुषमा डोंगरदिवे, उर्मिला सारडा, प्रतिभा फाटे यांना देण्यात आले.
याप्रसंगी शरण्य न्युजपेपर एजन्सीचे दिलीप साबळे, पवन न्युजपेपर एजंसीचे पवन गोतमारे उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन सुदेश मोरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sakhi forum members 'lucky draw'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.