संत गजाननांच्या पादुकांची आज स्थापना
By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-03-01T00:10:21+5:302016-03-01T00:10:21+5:30
राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्यात गुरुवारी चांदीच्या पादुकांचा अभिषेक केला जाणार आहे.

संत गजाननांच्या पादुकांची आज स्थापना
‘श्रीं'चा चौरंगही आणणार : खापर्डे वाडा
अमरावती : राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्यात गुरुवारी चांदीच्या पादुकांचा अभिषेक केला जाणार आहे. श्री संत गजानन महाराज ज्या चौरंगावर बसले होते, तो चौरंगही खापर्डे वाड्यातील चौथऱ्यावर दोन दिवस दर्शनासाठी ठेवला जाणार आहे.
श्री संत गजानन महाराज हे खापर्डे वाड्यातील चौथऱ्यावर बसले होते. गजानन महाराजांवर लिहिण्यात आलेल्या दासगणू महाराजांच्या पोथीतील १३ व्या अध्यायात तसा उल्लेख आहे. महाराज बसायचे त्या ठिकाणी उंबराचे झाड होते. अलिकडेच ते झाड संशयास्पदरित्या नष्ट करण्यात आले. त्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर महाराजांच्या पादुकांची स्थापना मंगळवारी सकाळी आठ वाजता केली जाणार आहे. प्रकट दिनानिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते सकाळी पादुकांची स्थापना केली जाईल. मंगळवारी सकाळी ११ वाजता महाआरती होईल. झुनका-भाकरीचा महाप्रसाद भक्तांना वितरीत करण्यात येईल.