संत बेंडोजी महाराज पालखी पिंपळदकडे मार्गस्थ
By Admin | Updated: July 7, 2016 00:04 IST2016-07-07T00:04:47+5:302016-07-07T00:04:47+5:30
आषाढी एकादशीच्या महा पवित्र मुहूर्तावर काळ्या सावळ्या विठाईचे दर्शन घेण्याची ओढ आता संपणार असून संत बेंडोजी महाराज पालखीने पिंपळोद मार्गस्थ केले आहे़

संत बेंडोजी महाराज पालखी पिंपळदकडे मार्गस्थ
हजारो वर्षांची परंपरा : विदर्भातील एकमेव पालखी
धामणगाव रेल्वे/चांदूररेल्वे :
पंढरीसी जारे आल्याने,
संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग
माजे क निची आवडी,
पंढरपुरा नेईन गुढी
नाम घेता वाट चाली,
यश पाऊला पाऊली
आषाढी एकादशीच्या महा पवित्र मुहूर्तावर काळ्या सावळ्या विठाईचे दर्शन घेण्याची ओढ आता संपणार असून संत बेंडोजी महाराज पालखीने पिंपळोद मार्गस्थ केले आहे़
राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान तसेच विदर्भातील एकमेव संजीवनी समाधी स्थान असलेल्या घुईखेड येथील संत बेंडोजी महाराज पालखीला दीडशे वर्षांची परंपरा आहे़ गत २ जून रोजी निघालेली ही संत बेंडोजी महाराज पालखी टाळ मृदंगाच्या गजारात व विठ्ठल नामाच्या जयघोषात आषाढीवारीने पंढरपूरकडे आगेकुछकरीत बुधवारी लोणदमध्ये पोहचली आहे़ येथून पिंपळदोकडे मार्गस्थ होणार आहे़ या पालखी सोबत हजारो भाविक जुळले आहेत़
संत ज्ञानेश्वर माऊली नंतर स्वतं: शिष्य व भक्तांना साक्ष ठेवून १६ व्या वर्षी समाधी घेतलेले संत बेेंडोजी महाराज व सन १९३१ पासून वऱ्हाड प्रांतातील एकमेव असलेल्या पालखी चा मान माऊलीच्या पालखीसह विठ्ठल मंदिरात पुढून प्रवेश करणाऱ्या २१ मानकऱ्यांमध्ये १७ वा क्रमांक आहे़ ही परंपरा कायम आहे़ आजपर्यंत संत बेेंडोजी महाराज या संस्थानला संत ज्ञानेश्वर माऊलीच्या काळातच सन १३३७ मध्ये असणारे प्राचीन मंदीर म्हणून पहिला बिल्ला, तर दुसऱ्यांदा सन १८१९ असे दोन बिल्ले, असा मान प्राप्त झाला आहे़ सर्वात प्रथम खुशाल महाराज यांनी त्या काळात पंढरपूरला पालखी नेण्यासाठी सुरूवात केली होती. शंकरराव बढे, विठोबा काकडे, पुंढलीक येवले, गोडेमहाराज ही संत बेंडोजी महाराजांची पालखी घेवून जात आहे़ संस्थानचे अध्यक्ष दिनकरराव रामचंद्र घुईखेडकर यांच्या नेतृत्वात या पालखीचा दरवर्षी घुईखेड ते पैठण व तेथून आळंदी, ते पंढरपूर असा ४८ दिवसाचा प्रवास या वारीतून होतो. प्रश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, याभागातील अनेक तालुक्यातील वारकरी बेंडोजी महाराजांच्या पादुका आपल्या डोक्यावर घेण्याकरीता एकच गर्दी करीत आहे़ (तालुका प्रतिनिधी)
झुनका भाकरीची न्याहारी
विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या संत बेंडोजी महाराज पालखीतील वारकऱ्यांनी अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद असे जिल्हे पार करून पैठण येथील संत एकनाथांच्या पायथ्याशी नथमस्तक होत पुढे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत पिंपळदोकडे मार्गस्त झाली आहे़
माऊलीच्या पालखीसह विठ्ठल मंदिरात पुढून प्रवेश करणाऱ्या २१ मानकऱ्यामध्ये १७ वा क्रमांक विदर्भाला मिळालेला हा बहुमान आहे़ पालखीत शेकडो वारकरी सहभागी झालेले आहेत.
- प्रवीण घुईखेडकर,
विश्वस्त, संत बेंडोजी महाराज देवस्थांन, घुईखेड