शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

प्रेम प्रकरणातून भरदिवसा चाकुने भोसकून तरुणीची हत्या, साईनगर परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 18:11 IST

प्रेमप्रकरणानंतर निर्माण झालेल्या वादातून एका तरुणीची चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. साईनगरस्थित बिहाडी चौकात गुरुवारी दुपारी १२.१० वाजता घडलेल्या या थरारक घटनेमुळे अमरावतीत खळबळ उडाली.

अमरावती : प्रेमप्रकरणानंतर निर्माण झालेल्या वादातून एका तरुणीची चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. साईनगरस्थित बिहाडी चौकात गुरुवारी दुपारी १२.१० वाजता घडलेल्या या थरारक घटनेमुळे अमरावतीत खळबळ उडाली. प्रतीक्षा मुरलीधर मेहेत्रे (२२,रा. छाबडा प्लॉट) असे मृत तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे, या हत्या प्रकरणातील आरोपी राहुल बबन भड (३२,रा.मुदलीयारनगर) याने प्रतीक्षाशी लग्न झाल्याचा दावा करीत कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्रतिक्षा मेहेत्रे तिची मैत्रीण श्वेता बायस्कर हिच्यासोबत दुचाकीने साईनगरातील ओंकार मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन साईनगर मार्गाने परत येताना बिहाडी चौकात दुचाकीवर आलेला राहूल भड याने प्रतीक्षाचे वाहन थांबविले. दोघांमध्ये चर्चा होऊन वाद उफाळला आणि राहुलने प्रतीक्षावर चाकुने प्राणघातक हल्ला केला. यात प्रतीक्षाच्या मानेत चाकू खुपसला, तर तिच्या छाती व पोटावर गंभीर वार केल्याने भर रस्त्यावर घडलेला हा थरार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हल्ला करून राहुल निघून गेल्यानंतर काही नागरिकांनी प्रतीक्षाला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रतीक्षाला मृत घोषित केले. माहितीवरून राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी व इर्विन रुग्णालयात धाव घेतली. पंचनामा व चौकशीनंतर आरोपी राहुल भडचा पोलिसांनी शोध सुरू केला. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. 

प्रेम प्रकरणाचा थरारक अंतआरोपी राहुल भड व मृतक प्रतीक्षा मेहेत्रे यांच्यात चार ते पाच वर्षांपासून प्रेमसंबध होते. दरम्यानच्या काळात दोघांमध्येही खटके उडाले आणि ताटातूट झाली. हा वाद कौटुंबिक न्यायालयात गेला. राहुल भड याने कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल करून प्रतीक्षाशी लग्न झाल्याचा दावा केला, तर प्रतीक्षाने हा दावा फेटाळला होता. ४ आॅक्टोबर रोजी प्रतीक्षाने फ्रेजरपुरा पोलिीसांकडे तक्रार नोंदविली. त्यामध्ये राहुलने बनावट फेसबुक खाते उघडून तिचा फोटो अपलोड केल्याचे म्हटले होते. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुल भडविरुद्ध कलम ६६(ड) आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. पोलिसांनी राहुलचा शोध सुरू केल्यानंतर २६ आॅक्टोबर रोजी प्रतीक्षा पुन्हा फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात गेली आणि कौटुंबिक न्यायालयात प्रकरण सुरू असल्याचे सांगत राहुलला अटक करू नका, असे पोलिसांना लेखी लिहून दिले. त्यामुळे पोलिसांनी पुढील कारवाईला बे्रक दिला. बुधवारी रात्री ८ वाजता प्रतीक्षा व तिच्या वडिलांनी फ्रेजरपुरा ठाणे गाठले आणि राहुलने वर्धा येथील मामा व वडिलांना धमकी दिल्याची तक्रार पोलिसांना दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरूच केली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी प्रतीक्षाची हत्या करण्यात आली. 

विवाह प्रमाणपत्र जप्तराहुल व प्रतीक्षा यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. यशोदा नगरातील देव महाराज संस्थान येथे २०१३ मध्ये दोघांनी लग्न केल्याचे त्यावरून लक्षात येत आहे. मात्र, हे प्रमाणपत्र खोटेसुद्धा असू शकते, याची शंका राजापेठ पोलिसांना आहे.

आरोपी राहुल भट व मृत प्रतीक्षा यांच्यात प्रेमसंबध होते. त्यांच्या लग्नाविषयीच्या वादाचे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात प्रविष्ट आहे. दरम्यान ही हत्या करण्यात आली. आरोपीच्या शोधार्थ तीन पथके तयार केले आहेत. - शशिकांत सातव, पोलीस उपायुक्त, अमरावती

 

टॅग्स :AmravatiअमरावतीMurderखून