धामणगावात साई बालाजी ब्लास्टरने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST2021-02-10T04:13:46+5:302021-02-10T04:13:46+5:30
पान ३ साठी डीपीेएल क्रिकेट स्पर्धा : मॉर्निंग क्रिकेट क्लबचा पुढाकार धामणगाव रेल्वे : मॉर्निंग क्रिकेट क्लबच्यावतीने येथील ...

धामणगावात साई बालाजी ब्लास्टरने मारली बाजी
पान ३ साठी
डीपीेएल क्रिकेट स्पर्धा : मॉर्निंग क्रिकेट क्लबचा पुढाकार
धामणगाव रेल्वे : मॉर्निंग क्रिकेट क्लबच्यावतीने येथील मिश्रीकोटकर मैदानात सहा दिवसांची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात विदर्भातील नामवंत सहा चमूंनी सहभाग घेतला होता. यात साई बालाजी ब्लास्टर अव्वल, तर शानू साई चॅलेंजर ही चमू उपविजेता ठरली.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास बुटले, संजय सायरे, अतुल भोगे उपस्थित होते. पंच म्हणून हेमंत बेलसरे, राजू बोरकर, नंदू सोरगीवकर यांनी जबाबदारी सांभाळली. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अतुल बुटले, शैलेश बोरकर, कांचू मलकान, अमन मारवे, सुरेश तातड, शोएब कुरेशी, तेजस मेश्राम, प्रतीक मेश्राम, सलीम खान, राणा जाधव, अखिलेश पोळ, ऋषभ ठाकूर, बंटी वानखडे, अभय जैन, अक्षय दासरवार यांनी परिश्रम घेतले.