सागवान तस्करांचा पोलीस पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:59 PM2019-07-08T22:59:44+5:302019-07-08T23:00:15+5:30

एका संशयास्पद वाहनाचा पाठलाग करीत सौदागरपुऱ्यात शिरलेल्या पोलीस पथकावर हल्ला चढविण्यात आला. रविवारी रात्री १० ते १ च्या सुमारास ब्राम्हणवाडा थडी येथे हा थरार घडला. याप्रकरणी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, चौघे आरोपी पसार झालेत.

Sagwan slaps police squad | सागवान तस्करांचा पोलीस पथकावर हल्ला

सागवान तस्करांचा पोलीस पथकावर हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देब्राह्मणवाडा थडी येथील घटना : एक लाखाचे सागवान जप्त, सहा आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा/ब्राम्हणवाडा थडी : एका संशयास्पद वाहनाचा पाठलाग करीत सौदागरपुऱ्यात शिरलेल्या पोलीस पथकावर हल्ला चढविण्यात आला. रविवारी रात्री १० ते १ च्या सुमारास ब्राम्हणवाडा थडी येथे हा थरार घडला. याप्रकरणी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, चौघे आरोपी पसार झालेत. सर्व १० आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, २९४, १४३, १४७, १४८, १४९, १८६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींच्या घरातून सुमारे ४६ हजार १५५ रुपये किमतीचे सागवान जप्त करण्यात आले.
ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे हे रविवारी रात्री त्यांच्या सहकाऱ्यांसह एका तपासकामी ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असताना त्यांना एक चारचाकी वाहनाबाबत संशय आला. त्यात सागवान असल्याची कुणकूण लागताच कवाडे यांनी त्या वाहनाचा पाठलाग चालविला. ते वाहन ब्राम्हणवाडयाच्या सौदागरपुºयात शिरले. मागोमाग पोलीस पथकही पोहोचले. कवाडे व त्यांचे सहकारी त्या वाहनाची झाडाझडती घेत असताना अचानक १२ ते १२ जणांनी पोलीस पथकावर काठी, सेंट्रींगच्या राफ्टरने हल्ला चढविला. अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. यात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक गजेंद्र ठाकरे जखमी झाले. आरोपींनी पोलिसांच्या ताब्यात असलेले वाहन पळवून नेले. तत्पूर्वी त्या वाहनातून आरोपींच्या घरात काढून ठेवलेले सागवान जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेने तत्काळ ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. ठाणेदार सचिनसिंग परदेशी यांनी तातडीने सौदागरपुरा गाठून शेख मजिद शेख अजीज (५५), मोहम्मद सादिक शेख इसराइल (४७), मोहम्मद फाजील मोहम्मद सादिक (१९), मोहम्मद आसिफ शेख युनूस (१९), मोहम्मद शहजाद मोहम्मद सादिक (२०, सर्व रा. ब्राम्हणवाडा थडी) व नौशाद अली मोहम्मद अली (२२, रा. मार्कंडा) या सहा आरोपींना अटक केली. मोहम्मद नासिर शेख अमिर, मोहम्मद जावेद शेख हमिद, शेख हफिज शेख अमिर, मोहम्मद आफिज शेख अमिर (सर्व राहणार ब्राह्मणवाडा थडी) पसार आरोपींची नावे आहेत. या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सौदागरपुºयात अतिरिक्त पोलीस पथक तैनात करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांनीही घटनास्थळ गाठून परिस्थिती जाणून घेतली.
ब्राह्मणवाडा थडी तस्करींचा अड्डा
परतवाडा वनपरिक्षेत्र विभागांतर्गत असलेल्या ब्राह्मणवाडा थडी, मार्कंडा, घाटलाडकी परिसरात सर्वाधिक प्रमाणात सागवान तस्करी होत असल्याचे आतापर्यंत अनेकदा उघडकीस आले आहे. लाखो रुपयांची तस्करी होत असताना वनविभागाचे मौन संशयास्पद आहे. पोलीस पथकावर हल्ला करेपर्यंत सागवान तस्करांची मजल गेली आहे. ब्राह्मणवाडा थडी येथे घरोघरी अवैधरीत्या आरागिरण्या सुरू असून, वनकर्मचाऱ्यांवर अनेकदा हल्ले झाल्याने कुणीही तेथे धाड टाकण्यास धजावत नसल्याचे वास्तव आहे.

ब्राम्हणवाडा थडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. त्याप्रकरणी सहा आरोपींना लागलीच अटक करण्यात आली. चारपेक्षा अधिक आरोपी पसार झालेत. आरोपींच्या घरातून ४६ हजारांचे सागवान जप्त करण्यात आले.
- सचिनसिंग परदेशी,
ठाणेदार, ब्राम्हणवाडा थडी

Web Title: Sagwan slaps police squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.