सुरक्षित बालपण पंधरवडा आज पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:32+5:302021-03-17T04:14:32+5:30
केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत चाईल्ड लाईन इंडिया फाउंडेशनच्यावतीन शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांच्या संरक्षणाची ...

सुरक्षित बालपण पंधरवडा आज पासून
केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत चाईल्ड लाईन इंडिया फाउंडेशनच्यावतीन शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांच्या संरक्षणाची गरज लक्षात घेऊन त्यांना टोल फ्री क्रमांक १०९५ च्या माध्यमातून आपत्कालीन सेवा पुरविली जात आहे. त्याअंतर्गत चाईल्ड लाईनतर्फे ३१ मार्चपर्यंत सुरक्षित बालपण पंधरवडा साजरा केला जाणार आहे. १७ मार्च रोजी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृती, १८ मार्च रोजी कोरोनाकाळातील सुरक्षितता, १९ मार्च रोजी मुलांच्या मनावर झालेले दुष्परिणाम व सामाजिक स्वास्थ्य, २० मार्च रोजी कोरोना संक्रमित झाल्यानंतर घ्यावयाची काळजी चांगला-वाईट स्पर्श यापासून सुरक्षितता, आरोग्य व स्वच्छता या काळात योगाचे महत्त्व, बालविवाहावर आधारित पथनाट्य, स्वच्छ भारत सुंदर भारत, कोरोनामध्ये हरविलेले बालपण, जीवनात खेळाचे महत्त्व या संदर्भात टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन या पंधरवड्यात केले जाणार आहे.