धारणीत गारपिटीने रबीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:31 IST2018-02-16T01:31:06+5:302018-02-16T01:31:25+5:30

तालुक्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिकावर अस्मानी संकट ओढवल्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. याचा जबर तडाखा हरिसाल मंडळातील बैरागड सर्कल व सावलीखेडा मंडळातील राणीगाव सकर्लला बसला.

Rusty losses in hazardous waste | धारणीत गारपिटीने रबीचे नुकसान

धारणीत गारपिटीने रबीचे नुकसान

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर अस्मानी संकट : बैरागड, राणीगाव सर्कलमध्ये प्रचंड नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिकावर अस्मानी संकट ओढवल्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. याचा जबर तडाखा हरिसाल मंडळातील बैरागड सर्कल व सावलीखेडा मंडळातील राणीगाव सकर्लला बसला. उभे पीक जमिनीवर लोळल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे.
रविवारी सकाळी ९ ते ११ दरम्यान तालुक्यात गारपीट व वादळी पाऊस झाला. यामध्ये धूळघाट रेल्वे, राणीगाव, टेंबली, बासपानी, उकुपाटी, हरदोली, पोहरा, चाकर्दा, गोबरकहू, कोबडाढाणा, पाडीदम येथील २ हजार हेक्टरमधील चना, गहू, तूर, संत्रा व आंब्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटातून कसे बाहेर पडावे, अशा प्रश्न पडला आहे.

धारणी तालुक्यासह चिखलदऱ्यात झालेल्या अवकाळी गारपीट व पावसामुळे झालेल्या रबी पिकाच्या नुकसानीचा पंचनामा तत्काळ तयार करण्याची सूचना सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. कोणाचेही पंचनामे राहू नये, अशी सूचना दिली आहे.
- विजय राठोड,
उपविभागीय अधिकारी, धारणी

Web Title: Rusty losses in hazardous waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.