शाळांमध्ये आधार नोंदणीसाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:41+5:302021-09-19T04:13:41+5:30
अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्याचे आधार नोंदणी अनिवार्य केल्याने शाळांची धावपळ सुरू झाली आहे. सर्व ...

शाळांमध्ये आधार नोंदणीसाठी धावपळ
अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्याचे आधार नोंदणी अनिवार्य केल्याने शाळांची धावपळ सुरू झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांकडून शाळांची आधार क्रमांकाची माहिती मागविणे सुरू केले आहे.
शाळांच्या संच मान्यतेकरिता शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अनिवार्य करणारे परिपत्रक ८ सप्टेंबर रोजी काढले आहे. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण न झाल्यास त्यांना पटसंख्येतून वगळून संचमान्यता करण्यात येईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांनी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सुरू केली आहे. काही शाळांनी गुगल फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून ही माहिती संकलित करणे सुरू केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, माता आणि पिता, पालकांचा व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, मातृभाषा, जात आणि धर्म आरटीईतून झालेले प्रवेश, विद्यार्थ्यांची जन्मतारीख, दिव्यांगांची माहिती इत्यादी मागविली आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात मिळणाऱ्या सवलती शिष्यवृत्ती तसेच इतर गरजांसाठी आधार क्रमांक आणि इतर माहिती एकत्रित करण्यात येत आहे.