बिझीलँड,सिटीलँडवर खंडणीबहाद्दरांची वक्रदृष्टी
By Admin | Updated: August 16, 2016 23:58 IST2016-08-16T23:58:36+5:302016-08-16T23:58:36+5:30
कापड उद्योगात भरारी घेऊन अल्पावधीत संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवणाऱ्या बिझीलँड आणि सिटीलँड उद्योगसमूहावर खंडणीबहाद्दरांची वक्रदृष्टी वळली आहे.

बिझीलँड,सिटीलँडवर खंडणीबहाद्दरांची वक्रदृष्टी
लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न : बदनामीपोटी तक्रार देण्यास व्यापाऱ्यांचा नकार
मंगेश तायडे नांदगाव पेठ
कापड उद्योगात भरारी घेऊन अल्पावधीत संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवणाऱ्या बिझीलँड आणि सिटीलँड उद्योगसमूहावर खंडणीबहाद्दरांची वक्रदृष्टी वळली आहे. व्यापाऱ्यांकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न सुरू असून या ना त्या प्रकरणात व्यापाऱ्यांना गोवण्याचे षड्यंत्र खंडणीबहाद्दरांनी आखले आहे.
कापड उद्योग समूह निर्माण करून तीनशे एकरांत बिझीलँड आणि सिटीलँड उद्योग पसरला असून रेडिमेड गारमेंट हब म्हणून देशाच्या नकाशावर नांदगाव पेठ ला एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. नांदगाव पेठसह अमरावती आणि आजूबाजूच्या गावांमधील बेरोजगारी खऱ्या अर्थाने दूर करण्यास या दोन्ही उद्योगसमूहाला यश मिळाले आहे. बिझीलँड आणि सिटीलँडच्या भरवशावर परिसरातील चार हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. ाांदगाव पेठमधील अधिकांश महिला पुरुष व युवा वर्ग येथे कामाला असून कोणतीही शैक्षणिक मर्यादा न ठेवता बिझीलँड आणि सिटीलँडने दरमहा ८ ते १७ हजार रुपये मिळकतीच्या नोकऱ््या दिल्या आहेत.
देशातील बेरोजगारी दूर करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाला खऱ्या अर्थाने बिझीलँड, सिटीलँडने पूर्ण केले असून जिल्ह्यातील एक मोठी बेरोजगारीची समस्या मिटवणाऱ्या या उद्योगसमूहाकडे काही वर्षांपासून खंडणीबहाद्दरांनी या ना त्या कारणाने त्रास द्यायला सुरुवात केली आहे. काही सामाजिक संघटना, पक्ष व वृत्तपत्राचे तोतया प्रतिनिधिंनी धाक दाखवून खंडणी वसुलीचा मार्ग अवलंबला आहे. आतापर्यंत या उद्योगसमूहाने खंडणी दिली नसली तरीपण बऱ्याच प्रमाणात सहयोग राशी दिल्याचे चर्चिले जात आहे. एका खंडणीबहाद्दर समूहाने मोठ्या रकमेची मागणी बिझीलँड कंपनीला केल्याची माहिती आहे. मात्र याची कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.