‘त्या’ तरुणासोबत आणखी दोघे बुडाल्याची अफवा

By Admin | Updated: August 13, 2015 00:57 IST2015-08-13T00:57:00+5:302015-08-13T00:57:00+5:30

बडनेऱ्यातील २० वर्षीय तरुणाचा कोंडेश्वरच्या तलावात बुडाल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मृत प्रवीणसोबत आणखी दोन युवक बुडाल्याच्या अफवेने ...

'The' rumor of two more couples with the youth | ‘त्या’ तरुणासोबत आणखी दोघे बुडाल्याची अफवा

‘त्या’ तरुणासोबत आणखी दोघे बुडाल्याची अफवा

बडनेरा : बडनेऱ्यातील २० वर्षीय तरुणाचा कोंडेश्वरच्या तलावात बुडाल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मृत प्रवीणसोबत आणखी दोन युवक बुडाल्याच्या अफवेने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र, एकाच तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
जुन्या वस्तीतील कंपासपुरा परिसरातील रहिवासी २० वर्षीय प्रवीण राजेंद्र पंधरे या युवकाचा कोंडेश्वरच्या तलावात बुडून मंगळवारी मृत्यू झाला. मात्र ‘व्हॉटस अ‍ॅप’वरून प्रसारित संदेशामध्ये घटनेच्यावेळी प्रवीणसोबत आणखी दोन युवक होते व ते देखील तलावात बुडाल्याचे सांगण्यात आले. या संदेशामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रशासनाने दोन्ही तरूणांचा शोध घेतला असता, अशी कुठलीच बाब समोर आली नाही.
तलावात एकाचाच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी मृत प्रवीणच्या वडिलांचे बयाण नोंदविले आहे. त्यांनी देखील प्रवीणसोबत बांडाबुचे व लांडे नामक युवक असल्याचा संशय पोलिसांसमोर व्यक्त केला. याप्रकरणी दोन्ही युवकांची चौकशी होणार आहे.

Web Title: 'The' rumor of two more couples with the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.